वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हरियाणातील कुस्तीगिरांच्या आंदोलनाला आता पुरते राजकीय वळण लागले आहे. शनिवारी सकाळी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जंतर- मंतरवर जाऊन कुस्तीगिरांची भेट घेतली, तर सायंकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुस्तीगिरांची भेट घेतली.Kejriwal’s jump in Kustigir movement; Inciting the people of the country to take a holiday and come to Delhi
अरविंद केजरीवाल कुस्तीगिरांची नुसती भेटच घेऊन थांबले नाहीत, तर सगळ्या देशवासीयांना सुट्टी घेऊन दिल्लीत येण्याची त्यांनी चिथावणी दिली. कुस्तीगिरांचे आंदोलन शेतकरी आंदोलनाच्या वळणावर चालल्याची ही खूण आहे. कुस्तीगीर आंदोलनाला बाहेरून दिल्लीत येऊन जे पाठिंबा देतील, त्यांची सगळी व्यवस्था आपण करू, असा शब्द केजरीवाल यांनी दिला आहे. त्यामुळे कुस्तीगिरांचे आंदोलन आता संपूर्णपणे राजकीय स्वरूपात चिघळणार असल्याचीच ही नांदी आहे.
आंदोलनकर्ती कुस्तीगीर विनेश फोगट हिने हरियाणातले कुस्तीगीर राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा खेळणार नाहीत, तर फक्त ऑलिंपिक स्पर्धा खेळतील, असे परस्पर जाहीर केले आहे. त्यातून कुस्तीगीर महापरिषदेचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांनी केलेल्या आवाहनाला हरियाणातील कुस्तीगिरांनी पूर्ण हरताळ फसला आहे. त्यानंतरच अरविंद केजरीवाल यांनी जंतर – मंतरवर जाऊन सर्व कुस्तीगिरांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केल्याने आंदोलकांचा राजकीय हेतू उघड्यावर आला आहे.
त्याचबरोबर केजरीवालांनी देशातल्या सर्व नागरिकांना सुट्टी घेऊन दिल्लीत जंतर – मंतरवर येऊन कुस्तीगिरांना पाठिंबा देण्याची चिथावणी देण्यातून कुस्तीगीरांचे आंदोलन शेतकरी आंदोलनासारखे पेटवण्याचा डाव खेळला आहे.
कुस्तीगिरांच्या आंदोलनात आधीच ब्रजभूषण सिंह यांचे अध्यक्षपदाचे स्पर्धक काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुड्डा सामील झालेच आहेत. त्यांच्यामुळे प्रियांका गांधी यांनी सकाळी येऊन आंदोलकांची भेट घेतली, तर सायंकाळी केजरीवाल त्यांच्याबरोबर सामील झाले यातूनच कुस्तीगीरांचे आंदोलनाचा फक्त क्रीडा क्षेत्रापुरते नमर्यादित राहता त्याचे पुरते राजकीयकरण झाले आहे.
Kejriwal’s jump in Kustigir movement; Inciting the people of the country to take a holiday and come to Delhi
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन FIR दाखल!
- बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध पॉक्सोसह 2 गुन्हे दाखल; कुस्तीपटू म्हणाले, अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील
- ‘’मागच्या जन्मीचं पुण्य आज माझ्या कामी येतय’’ मॉरिशसमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणानंतर फडणवीसांचे उद्गार!
- कुस्तीगीर ते बारसू : नवे शेतकरी आंदोलन “इन मेकिंग”!!