विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी तत्कालिन मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या मतदासरंघात उभे राहून त्यांचा पराभव केला होता. भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यासमोर हाच आदर्श आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गोरखपूर मतदारसंघातून ते लढणार आहेत.Kejriwal is role model of Chandrshekhar Aazad, want to defeat Yogi Aaditynath
चंद्रशेखर आझाद यांनी योगी आदित्यनाथ यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले आहे. वृत्तवाहिन्यांनी त्यासाठी तारीख निश्चित करावी असेही त्यांनी म्हटले आहे. आझाद म्हणाले, मी काही दिवसांपासून म्हणत होतो की योगी जेथून निवडणूक लढवतील तेथे मी निवडणूक लढवणार आहे.
आदित्यनाथ यांनी खूप उशिरा निर्णय घेतला. प्रथम ते मथुरा, नंतर अयोध्या, नंतर ते त्यांच्या सुरक्षित क्षेत्र, गोरखपूरमध्ये गेले. पण गोरखपूरच्या जनतेला त्यांच्या सरकारचा हुकूमशाही, गुंडागर्दी आणि भ्रष्टाचाराची पूर्ण कल्पना आहे.
मी माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर, मला नवीन सरकारची मागणी करणारी 30,000 समर्थन पत्रे मिळाली. आदित्यनाथ यांनी आगामी निवडणुकीत मथुरा किंवा अयोध्येत निवडणूक लढविली तरी आपण त्यांच्याविरोधात लढण्यास तयार आहोत. योगींबरोबर खऱ्या मुद्यांवर वादविवाद होण्याची वाट पाहत आहे.
त्यानंतरच लोक त्यांच्या कामाचा माणूस कोण आहे हे समजू शकतील. ते मला कधीही पराभूत होऊ देणार नाहीत. एक वेळ अशी येईल अहंकारामुळे निरपराध लोकांवर केलेल्या दडपशाहीला लोक कंटाळून जातील.
आझाद यांनी बहुजन समाज पार्टीवरही जोरदार हल्ला चढवला. बहुजन समाज पक्ष संस्थापक कांशीराम यांचा वारसा विसरत चालला आहे. त्यांच्याच विचारांची हत्या केली जात आहे.
Kejriwal is role model of Chandrshekhar Aazad, want to defeat Yogi Aaditynath
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदके, इथे वाचा संपूर्ण यादी
- MUMBAI : मंत्रालयाच्या मुख्य गेटवर SRPF जवनाने स्वतःवर झाडली गोळी , उपचारादरम्यान मृत्यू
- मोठी बातमी : जालन्यातील शेतकऱ्यांचा अजित पवार, शिवसेनेच्या खोतकरांवर गंभीर आरोप, साखर कारखान्यातून अन्नदात्याची घोर फसवणूक
- Budget 2022 : खप वाढवण्यासाठी सरकारने नोकरदार-गरिबांना मदत करावी, कोरोना काळात फटका बसलेल्या रिटेल क्षेत्राची अर्थमंत्र्यांकडे मागणी