• Download App
    दिल्लीतील मुलीवरील अत्याचारावरून विरोधक आक्रमक, केजरीवालांकडून चौकशीचे आदेश। Kejariwal orders judicial probe

    दिल्लीतील मुलीवरील अत्याचारावरून विरोधक आक्रमक, केजरीवालांकडून चौकशीचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – राजधानीतील दलित मुलीवरील अत्याचार आणि खूनप्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे निर्देश देत मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर केली. Kejariwal orders judicial probe



    काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. न्यायासाठीच्या या लढाईमध्ये आपण सदैव त्यांच्यासोबत राहू असे सांगतानाच त्यांनी या लढ्यातून एक इंचदेखील माघार घेणार नाही असे स्पष्ट केले. या पीडितेचे कुटुंबीय केवळ न्याय मागत असून त्यांना सर्वोतपरी मदत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी ईशान्य दिल्लीतील जुन्या नानगल भागामध्ये आंदोलन सुरू केले असून त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून राज्य सरकार विद्वान वकिलांची नेमणूक करेल असे आश्वाकसन केजरीवालांनी यावेळी दिले.

    Kejariwal orders judicial probe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!