विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेच्या 2024 च्या निवडणुका अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपल्या असताना केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध मोठी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करणारे अनेक नेते वेगवेगळ्या राजकीय प्लॅटफॉर्मवर पुढे आले आहेत. यापैकी एक महत्त्वाचे नेते म्हणजे तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव. गेल्या काही महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन मोदी आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. kcr his best friend. People hardly know what friendship we have between us.
पण याच चंद्रशेखर राव यांनी अचानक एक वेगळेच वक्तव्य केले आहे, ते देखील ऑफ द रेकॉर्ड नव्हे, तर ऑन रेकॉर्ड… “मला मोदींविषयी प्रचंड आदर आहे. माझ्या मनात मोदींच्या विरोधात अजिबात कोणतीही भावना नाही. उलट मी आपणाला सांगू इच्छितो आणि हे ऑन रेकॉर्ड सांगू इच्छितो की, मी मोदींचा बेस्ट फ्रेंड आहे. आमची फ्रेंडशिप तुम्हाला सांगूनही लक्षात येणार नाही, इतकी घट्ट आहे!!”, अशा शब्दात चंद्रशेखर राव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गेल्या साधारण 6 महिन्यांपासून विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन चंद्रशेखर राव यांनी मोदीविरोधी आघाडी मजबूत करण्याचा आणि आपले स्वतःचे नेतृत्व त्या आघाडीत एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी आत्तापर्यंत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
आता त्यांनी स्वतःला मोदींचे बेस्ट फ्रेंड असे संबोधले आहे. त्यामुळे देशभरातल्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रशेखर राव हे गांभीर्याने मोदीविरोधी आघाडी उघडण्याचा खरंच प्रयत्न करत आहेत का??, अशा शंका देशभरातल्या राजकीय वर्तुळातून विचारल्या जात आहेत.
जगन मोहन रेड्डी – मोदी भेट
चंद्रशेखर राव यांनी आपण मोदींचे बेस्ट फ्रेंड म्हटले असतानाच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली. आंध्र प्रदेशातील पोलावरण प्रकल्पाला गती देण्यासाठी जगन मोहन रेड्डी पंतप्रधानांना भेटल्याचे सांगण्यात येते. त्यांनी मोदींना बालाजीची मूर्ती भेट दिली.
एकीकडे चंद्रशेखरराव मोदींना बेस्ट फ्रेंड म्हणतात, तर दुसरीकडे जगन मोहन रेड्डी यांना बालाजीची मूर्ती भेट देतात त्यांच्याकडून आंध्रातल्या प्रकल्पाला गती मिळण्याचे अपेक्षा ठेवतात, याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत जोरकसपणे पुढे सरकत असताना आणि त्यांची यात्रा दक्षिणेतून उत्तरेत पोहोचली असताना दक्षिणेतल्या दोन महत्त्वाच्या प्रांतांचे मुख्यमंत्री मोदींना काहीशी अनुकूल राजकीय भूमिका घेतात, याचा नेमका राजकीय अर्थ काय काढायचा??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भविष्यात त्यांचा राजकीय प्रवास कसा असेल??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
kcr his best friend. People hardly know what friendship we have between us.
महत्वाच्या बातम्या