वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीर परिसीमन आयोगाने जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश विधानसभेच्या जागा वाढविल्या. काश्मिरी पंडितांना हक्काच्या जागा निर्माण केल्या. जम्मूतल्या जागा वाढविल्या आणि त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी जाण्याच्या मेहबूबा मुफ्ती चिडल्या…!! Kashmiri Pandits got rights, seats in Jammu increased; Mehbooba Mufti got angry
जम्मू-काश्मीर परिसीमन आयोग हा स्वतंत्र आहेच हा भाजपचाच विस्तारित अवयव आहे, असे टीकास्त्र मेहबूबा यांनी सोडले आहे. परिसीमन आयोगाने लोकसंख्येचा निकष न पाळता फक्त आणि फक्त 370 कलम हटविल्यानंतर त्यामध्ये त्याला अनुसरूनच विधानसभेच्या मतदारसंघांचे परिसीमन केले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या हक्कांची पायमल्ली तर झालीच, पण लोकसंख्यात्मक निकषावर आधारित लोकप्रतिनिधीत्व देखील संपले. यातून काश्मीरच्या विधानसभेत असंतुलित सत्ता विराजमान होईल, असा आरोप देखील मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
– 90 आमदारांची विधानसभा
जम्मू-काश्मीर परिसीमन आयोगाने जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेत एकूण 7 जागा वाढवून संख्या 90 वर नेली आहे. जम्मू विभागातल्या 6 जागा वाढल्या आहेत, तर काश्मीर विभागातली 1 जागा वाढली आहे. अनुसूचित जाती जमाती तसेच अन्य अशा मिळून एकूण 17 जागा राखीव ठेवल्या आहेत. यामध्ये काश्मिरी पंडितांच्या तसेच पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या विस्थापितांच्या लोकप्रतिनिधीत्वाचा देखील समावेश आहे.
भौगोलिक रचना, प्रशासकीय रचना विचारात घेऊन परिसीमन करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशिलचंद्रा यांनी दिली आहे. भौगोलिक सलगता न तोडतात जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणारे मतदारसंघ तयार केले आहेत. जनतेच्या सुखसोयी मध्ये येणारे प्रशासकीय अडथळे दूर केले आहेत, असे ते म्हणाले.
Kashmiri Pandits got rights, seats in Jammu increased; Mehbooba Mufti got angry
महत्वाच्या बातम्या