वृत्तसंस्था
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर काशीमध्ये जोरदार तयारी सुरू असताना त्यावर राजकारण देखील रंगले आहे.Kashi vishwanath corridor initiated by samajwadi party, claimed akhilesh yadav
आता समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या संकल्पनेवर आपलाच “हक्क” असल्याचा दावा केला आहे. किंबहुना काशी विश्वनाथ कॉरिडॉरची मूळ संकल्पना समाजवादी पक्षाची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे काम समाजवादी पक्षाच्या काळात सुरू झाले याचे कागदोपत्री पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो, असे त्यांनी अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मूळात काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन आणि त्याचा एवढा मोठा घाट मोदी आणि योगींनी का घातला आहे?, तर केंद्रातील मोदी सरकारने आणि राज्यातील योगी सरकारने शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु या दोन्ही सरकारांना ते जमले नाही म्हणून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन एवढ्या भव्य प्रमाणावर करण्यात येत आहे, असा दावा देखील अखिलेश यादव यांनी केला आहे.
या आधी अखिलेश यादव यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन परिवारासह पूजाअर्चा करण्याची घोषणा केली आहेच. अयोध्येचा विकास आराखडा समाजवादी पक्षाने तयार केला होता, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला आहे. तो दावा करून सहा महिने उलटले नाहीत, तोच काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे श्रेय देखील समाजवादी पक्षाकडे ओढून घेण्याचे त्यांनी आज प्रयत्न केले आहेत.
Kashi vishwanath corridor initiated by samajwadi party, claimed akhilesh yadav
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांना देशाच्या पंतप्रधान पदी पाहण्याची सूचक इच्छा व्यक्त केली खासदार अमोल कोल्हे यांनी
- लान्स नाईक विवेक कुमार यांच्या पत्नीने नवऱ्याला शेवटचा निरोप देताना आपल्या लग्नातील ड्रेस घातला, मेरा फौजी अमर रहे म्हणत दिला शेवटचा निरोप
- कॅटरिना कैफ आणि विकि कौशलच्या लग्नातील मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो
- Sharad Pawar Birthday : वाढदिवशी पवारांनी सांगितली कृषिमंत्री असतानाची आठवण, म्हणाले- बांधिलकी असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य