• Download App
    युक्रेनमधील खार्किवमध्ये गोळीबारात कर्नाटकच्या नवीन शेखरप्पाचा विद्यार्थ्याचा मृत्यूKarnataka's new Shekharappa student killed in shooting in Kharkiv, Ukraine

    Russia Ukraine War : युक्रेनमधील खार्किवमध्ये गोळीबारात कर्नाटकच्या नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    कीव्ह : रशिया – युक्रेनमधील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. युक्रेनमधील खार्किव येथे मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हावेरी जिल्ह्यातील चलागेरी येथील नवीन शेखराप्पा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. खार्किवच्या प्रशासनाने यापूर्वीच अशी माहिती दिली होती की, रशियाने या भागातील निवासी भागामध्ये गोळीबार केला. आता या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे.Karnataka’s new Shekharappa student killed in shooting in Kharkiv, Ukraine

    विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे काम युद्धपातळीवर

    युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे भारत सरकारचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना बुकारेस्टवरुन घेऊन येणारे सातवे विशेष विमान आज, मंगळवारी सकाळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले आहेत.

    ऑपरेशन गंगा मोहिमेत सहभागी

    मुंबई विमानतळावर आज सकाळी 7 वाजता एअर इंडिया एक्सप्रेसचे विशेष विमान दाखल झाले. या विमानाने हेन्री कोनाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुकारेस्टवरुन काल रात्री 11.10 वाजता मुंबईसाठी उड्डाण केले होते. ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणणारे हे सातवे विमान होते. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाईसजेट या विमान कंपन्या ऑपरेशन गंगा मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमधून दिल्ली आणि मुंबईकडे आणण्यात येत आहे.

    Karnataka’s new Shekharappa student killed in shooting in Kharkiv, Ukraine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही