विशेष प्रतिनिधी
बंगळूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीतच कर्नाटक सरकारने सोमवारी दहावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. १९ व २२ जुलै या दोन दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी दहावी व बारावीच्या परीक्ष रद्द केल्या आहेत. मात्र कर्नाटक सरकारने परीक्षा घेण्याचे ठरविले आहे.Karnataka will take 10th exams
शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार म्हणाले, १९ जुलै रोजी गणित, विज्ञान व समाज विज्ञान या तीन विषयांचा एक पेपर घेण्यात येईल. तर २२ जुलै रोजी तीन भाषा विषयांसाठी घेण्यात येईल. दोन्ही दिवस सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत (तीन तास) ही परीक्षा घेण्यात येणार असून सर्व विषयांमध्ये बहुविध निवड प्रश्नांच्या (एमसीक्यू) स्वरूपात प्रश्न असतील.
प्रत्येक विषयाला ४० गुण या प्रमाणे १२० गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ३० जुलैपूर्वी बारावीचा (द्वितीय पीयूसी) निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. १२ जणांच्या तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या सल्यानुसार बारावीचे मूल्यमापन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
Karnataka will take 10th exams
महत्त्वाच्या बातम्या
- बंगालमध्ये सर्वात कमी लसीकरण, बनावट प्रकरणेच अधिक, जे. पी. नड्डा यांनी केली पोलखोल
- तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोहोचतेय, इम्रान मंत्रीमंडळातील मंत्र्यानेच केला गौप्यस्फोट
- इथेनॉलचा वापर करून वाहने चालविणारी फ्लेक्स इंजिन तयार होणार, तीन महिन्यांत योजना आणणार असल्याची नितीन गडकरी यांची माहिती
- कोट्यवधी भारतीयांचा नारा जय हिंद द्रुमुकला मात्र खटकतोय, राज्यपालांच्या अभिभाषणातूनच वगळून टाकला, फुटिरतावादाची बिजे असल्याचा विरोधकांचा आरोप
- पब, डिस्को, बार चालतात मग गणेशोत्सव का नाही? आशिष शेलारांचा सवाल