सहावेळा ज्या मतदारसंघात विजयी झाले होते तिथेच झाला पराभव
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : भाजपविरोधातील बंडखोरी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना महागात पडली आहे. हुबळी धारवाड मध्य मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. त्यांना भाजपाच्या महेश टेंगीनकाई यांनी पराभूत केले. Karnataka Election Result Defeat of Jagdish Shettar who rebelled against BJP
या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त प्रतिष्ठेची जागा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची हुबळी धारवाड ही मानली जात होती. कारण, या मतदारसंघातून शेट्टर हे सहा वेळा विजयी झाले होते. मात्र या निवडणुकीत त्यांनी भाजपामधून काँग्रेसमध्ये उडी घेतली होती, मात्र ती उडी फसली आहे.
विशेष म्हणजे लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जाणारे शेट्टर यांना त्यांच्याच शिष्याच्या हातून पराभव स्वीकारावा लागला. शेट्टर यांचा पराभव करणारे भाजपाचे महेश टेंगीनकाई हे निवडणूक प्रचारादरम्यान स्वत: त्यांचे शिष्य असल्याचे सांगत होते.
Karnataka Election Result Defeat of Jagdish Shettar who rebelled against BJP
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : जर चित्रपट इतर राज्यांमध्ये शांततेने चालू शकतो, तर बंगालमध्ये बंदी का? – सुप्रीम कोर्टाचा सवाल!
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर किशोर आवारे खूनप्रकरणी गुन्हा, राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आईचा आरोप
- परमबीर सिंह यांचं निलंबन राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
- ‘’…म्हणून ‘गिरा तो भी टांग उपर’ ही भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंचे धोरण’’ आशिष शेलारांनी साधला निशाणा!