Saturday, 10 May 2025
  • Download App
    एकीकडे काँग्रेसचा पुनरूज्जीवन प्लॅन; दुसरीकडे कर्नाटकात शिवकुमारांचा कार्यकर्त्याच्या कानाखाली जाळ...!! Karnataka Congress President DK Shivakumar slaps a party worker for trying to put his hand on his shoulder in Mandya yesterday

    एकीकडे काँग्रेसचा पुनरूज्जीवन प्लॅन; दुसरीकडे कर्नाटकात शिवकुमारांचा कार्यकर्त्याच्या कानाखाली जाळ…!!

    वृत्तसंस्था

    मंड्या (कर्नाटक) – एकीकडे १० जनपथमधले काँग्रेसश्रेष्ठी पक्षाला पुनरूज्जीवन देण्यासाठी प्लॅन आखताहेत… तर दुसरीकडे चुकणाऱ्या कार्यकर्तांना संभाळून घेण्याऐवजी नेते आपला जूनाच खाक्या दाखवून कार्यकर्त्यांच्या कानाखाली जाळ काढताहेत… Karnataka Congress President DK Shivakumar slaps a party worker for trying to put his hand on his shoulder in Mandya yesterday

    होय हे खरे आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी पक्षाची वरपासून खालपर्यंत संघटना बदलण्यासाठी योजना आखत आहेत. पक्षाच्या प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला काम मिळावे असा प्रयत्न करीत आहेत. पक्षाला नवसंजीवनी देण्याचा त्यांचा मनसूबा आहे.

    तर दुसरीकडे नेते मात्र आपल्या जुन्याच भापात असल्यासारखे वागताना दिसत आहेत. कर्नाटकात मंड्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्याचा विडिओ खूप व्हायरल झाला आहे.

    डी. के. शिवकुमार काँग्रेसच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर एका गल्लीतून चालले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला बहुतेक डी. के. शिवकुमारांबरोबर सेल्फी काढायचा होता. पण डी. के शिवकुमारांना कार्यकर्ताचा हा आगावूपणा सहन झाला नाही. त्यांनी कार्यकर्त्याला नीट समजावून सांगण्याऐवजी त्याच्या कानाखाली जाळ काढला. ही घटना एवढी चटकन घडली की शिवकुमारांच्या सुरक्षा रक्षकांच्या देखील ते पटकन लक्षात आले नाही. पण शिवकुमारांनी त्याला मारून बाजूला काढताच सुरक्षा रक्षकांनी आणि शिवकुमारांच्या भोवती चालणाऱ्या स्थानिक नेत्यांनी संबधित कार्यकर्त्याला त्यांच्यापासून दूर नेऊन पुढे काढून दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. पण त्याचा विडिओ आज व्हायरल झाला आहे.

    Karnataka Congress President DK Shivakumar slaps a party worker for trying to put his hand on his shoulder in Mandya yesterday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    Icon News Hub