विशेष प्रतिनिधी
बेंगलोर : कर्नाटका विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जे निवडणूक पूर्व चाचण्यांचे कौल आले, ते काँग्रेसला अनुकूल ठरल्याबरोबर त्या पक्षात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात तुल्यबळांची स्पर्धा लागली आहे. पण यातच सिद्धरामय्यांनी दिलेल्या एनडीटीव्हीच्या मुलाखतीत काही बाबी उघडपणे समोर आल्या आहेत. Karnataka chief ministership race in Congress gets faster between siddaramaiah and d. K. Shivkumar
या मुलाखतीत सिद्धरामय्यांनी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत स्पर्धा तीव्र असल्याची कबुली दिली आहे. आपण स्वतः आणि डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण त्याच वेळी काँग्रेस हायकमांड कर्नाटकात निवडून आलेल्या आमदारांचे मत डावलून स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही, असा सुप्त इशाराही सिद्धरामय्या यांनी दिला आहे.
सिद्धरामय्या यांच्या या मुलाखतीवरून एनडीटीव्हीने मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाल्याच्या बातम्या केल्याबरोबर त्या बातम्या चुकीचा असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला आहे. डी. के. शिवकुमार आणि आपण स्वतः मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक आहोत. पण काँग्रेसची लोकशाहीवादी पार्टी आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेतूनच मुख्यमंत्री निवडला जाईल, असे आपण म्हटल्याचे म्हटल्याचा खुलासा सिद्धरामय्या यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.
राजकीय अर्थ
पण या सगळ्याचा राजकीय अर्थ असाच, की कर्नाटकात भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसला अनुकूल वातावरण तयार झालेले पाहताच पक्षामध्ये सर्वच नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा उफाळल्या आहेत. सिद्धरामय्या हे आधीच कर्नाटकचे मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. डी. के. शिवकुमार हे त्यांच्यापेक्षा तरुण असलेले नेते हे अनेक वर्षे कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री देखील होते. पण त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा अजून फळाला आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचे दिसताच त्यांनीही मुख्यमंत्री पदाच्या रिंग मध्ये आपली हॅट टाकली आहे. अर्थातच त्यामुळे कर्नाटकात प्रत्यक्ष निवडणूक होऊन काँग्रेसला बहुमत मिळण्यापूर्वीच पक्षातली मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाल्याचे दिसत आहे. सिद्धरामय्या यांच्या मुलाखतीतून त्याला पुष्टी मिळाली आहे, इतकेच!!
Karnataka chief ministership race in Congress gets faster between siddaramaiah and d. K. Shivkumar
महत्वाच्या बातम्या
- ‘’…तर राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचं काम उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केलं असतं’’ देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला!
- ”सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर…” देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसवर टीकास्त्
- COVID -19 करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने घेतला मोठा निर्णय!
- ”सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर…” देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसवर टीकास्त्र!