• Download App
    Karnataka : हुबळी-धारवाड महापालिकच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचा विजय Karnataka BJP wins the post of Mayor and Deputy Mayor of Hubli Dharwad Municipality

    Karnataka : हुबळी-धारवाड महापालिकच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचा विजय

    महापालिकेत सत्तेत येण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंगले

    विशेष प्रतिनिधी

    हुबळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 2023 मध्ये अपयश आलेल्या भाजपासाठी मंगळवार हा आनंदाची बातमी देणारा दिवस होता. हुबळी-धारवाड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली असून भाजपाने सलग दुसऱ्यांदा दोन्ही पदं पटकावून जिल्ह्याचा कारभार आपल्या ताब्यात कायम ठेवला आहे. Karnataka BJP wins the post of Mayor and Deputy Mayor of Hubli Dharwad Municipality

    मंगळवारी पार पडलेल्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या वीणा भारदवाड यांची महापौरपदी तर सतीश हंगल यांची उपमहापौरपदी निवड झाली आणि महापालिकेत सत्तेत येण्याचे काँग्रेसचे स्वप्न अखेर भंगले.

    माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, मंत्री सतीश जारकीहोळी आणि संतोष लाड यांनी या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखली होती, मात्र त्यांची रणनीती फसली. भाजपाच्या विजयामुळे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या कामात मोठा पेच निर्माण झाला आहे.

    Karnataka BJP wins the post of Mayor and Deputy Mayor of Hubli Dharwad Municipality

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य