विशेष प्रतिनिधी
बंगळूर : कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या मागणीने पुन्हा एकदा उचल घेतली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे. त्याबरोबर नेतृत्व बदलाची कुरबूर सुरू झाली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गृहमंत्री बसवराज बोम्मई, मुरगेश निराणी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असून त्यांनी तशा हालचाली सुरू केल्याचे समजते. Karnataka BJP leaders opposing yediurappa
राज्यातील नेतृत्वासाठी काही नेते आणि गट हायकमांडकडे आतापासूनच प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे. काही नेत्यांनी लॉबिंग करण्यास सुरवात केली आहे. मात्र पक्षातील अधिकृत सूत्रांच्या मते, किमान कोरोना कमी होईपर्यंत नेतृत्वात बदल होण्याची शक्यता नाही.
येडियुरप्पा हेच सध्या सरकार टिकवून ठेवण्यासाठी सर्वात उत्तम नेतृत्व आहे, अशी खात्री पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला खात्री आहे. बंद दाराआड होणाऱ्या बैठकीत मंत्री एकमेकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर येडियुरप्पा यांचे वाढते वय, भ्रष्टाचार आणि त्यांचा मुलगा विजयेंद्र यांचा सरकारमधील वाढता हस्तक्षेप यावरून त्यांचे प्रतिस्पर्धी कुरबूर करीत आहेत. मात्र येडियुरप्पांना पर्याय देण्याचे सामर्थ्य इच्छुक नेत्यांमध्ये नसल्याची केंद्रीय नेतृत्वाची भावना झाली आहे.