• Download App
    Karnataka assembly election results, Congress preparing for victory celebrations, BJP's real fight to increase its vote percentage share

    कर्नाटक निवडणूक उद्या निकाल : काँग्रेसची एकीकडे जल्लोषाची तयारी; दुसरीकडे मतांच्या टक्क्यांमध्ये वाढीची भाजपची खरी लढाई!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या 13 मे 2023 शनिवारी लागणार आहेत. त्या आधीच काँग्रेसने केवळ कर्नाटकातच नव्हे, तर देशभर जल्लोषाची तयारी केली आहे. कारण अनेक निवडणूक पूर्व चाचण्यांमध्ये आणि नंतर एक्झिट पोल मध्ये काँग्रेसला तिथे सत्तेवर येण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. Karnataka assembly election results, Congress preparing for victory celebrations, BJP’s real fight to increase its vote percentage share

    काँग्रेस या एक्झिट पोल वर अवलंबून जल्लोषाची तयारी करत आहे आणि त्यापुढे जाऊन कर्नाटक विधानसभेतील विजयाचा लाभ देशभर घेण्यासाठी स्ट्रॅटेजी आखत आहे. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार सिद्धरामय्या यांची बैठक झाली, तर दिल्लीत देखील राहुल गांधींनी एक बैठक घेतली. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहुल गांधींना भेटून आले. त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडी राहुल गांधींच्या कानावर घातल्या.

    मतांच्या टक्क्यांत वाढीची भाजपची लढाई

    या पार्श्वभूमीवर भाजप मात्र सावधगिरीने पावले टाकत आहे. मूळात भाजपने मीडिया परसेप्शनच्या विपरीत कर्नाटक मधली आपली लढाई काँग्रेस अथवा देवेगौडांच्या जेडीएसशी ठेवण्याऐवजी भाजपच्या वाट्याला येणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीत वाढीची ठेवली. भाजपला कर्नाटकात सर्वसाधारणपणे गेल्या तीन निवडणुकांमध्ये 35 टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत. ही टक्केवारी 5 ते 7 % नी वाढून टक्क्यांनी वाढून 42 % पर्यंत मिळवण्याचे भाजपने प्लॅनिंग केले होते. मतदानांची टक्केवारी जेवढी अधिक त्यापैकी मतदानाचा भाजपचा टक्का अधिक हे सूत्र भाजपने राबविले. त्यासाठी बूथ लेव्हलवर मायन्यूट प्लॅनिंग केले. त्याचा परिणाम उद्याच्या निकालात दिसणार आहे का?? आणि दिसला तर तो किती टक्के वाढीचा दिसेल??, हा भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण भाजपला या टक्केवारीचा लाभ 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही घ्यायचा आहे.

     काँग्रेसची टक्केवारी किती वाढली??

    मीडिया पर्सेप्शन नुसार काँग्रेसला तिथे विजयाची संधी आहे. पण मतांची टक्केवारी मात्र काँग्रेसची फारशी हललेली दिसत नाही. ती देखील 32 ते 35 % दरम्यानच राहिली आहे. याचा अर्थ काँग्रेसला जागा जास्त मिळवण्याची ओढ लागली आहे. पण मतदानाच्या टक्केवारी संदर्भात काँग्रेसचे कोणतेच नेते संपूर्ण निवडणूक काळात बोललेले नाहीत.

     बहुमताचा आकडा भाजप गाठणार??

    भाजपची तयारी मात्र मीडिया परसेप्शनच्या विपरीत मतदानाची पक्षाची टक्केवारी वाढविण्यासाठी दिसली. त्याचे परिणाम उद्या भाजपला अपेक्षित असे येतील का?? आणि मतदानाच्या टक्क्यांमधली वाढ भाजपला पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचा आकडा गाठून देईल का??, हा कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालाचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. त्यावर कोणताही मीडिया बोलायला तयार नाही. बहुतांश सगळे केवळ काँग्रेसच्या जागा वाढीच्या मुद्द्याभोवती फेर धरून उभे आहेत.

    Karnataka assembly election results, Congress preparing for victory celebrations, BJP’s real fight to increase its vote percentage share

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते