वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकात 14 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सकाळी चार तास वगळता राज्यात सर्व बंद राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियूरप्पा यांनी आज केली.Karnataka announces 14-day lockdown;Applicable from tomorrow; Four hours of essential service
राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून या संकटावर मात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात 27 एप्रिल रात्री 9 वाजल्यापासून ते 10 मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल.
दररोज सकाळी 6 ते 10 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. बस वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. मद्याची दुकाने पार्सल सेवेसाठी सुरू ठेवली आहे. 18 ते 45 वयोगटातील लोकांना कोरोनाची मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली .
औद्योगिक क्षेत्रातील आस्थापने सुरु राहतील. कापड दुकाने बंद राहणार असून बांधकाम क्षेत्र मात्र सुरु ठेवले जाणार आहे.
Karnataka announces 14-day lockdown;Applicable from tomorrow; Four hours of essential service
महत्त्वाच्या बातम्या
- Mission Vayu : भारताला तातडीने १० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवण्यासाठी अमेझॉनचा पुढाकार
- कौतुकास्पद : भाजप आमदार गायकवाडांनी ऑक्सिजन प्लांटसाठी दिला १ कोटीचा निधी; मुलाचे लग्न साधेपणाने करून त्या खर्चात लसीकरण
- राज्यांच्या लसींबद्दलच्या प्रत्येक प्रश्नाला केंद्रीय आरोगमंत्र्यांकडून उत्तर, वाचा… डॉ. हर्षवर्धन यांच्या खुल्या पत्रातील टॉप १० मुद्दे
- आमने-सामने : संजय राऊत उघडा डोळे बघा नीट गेल्या पाच वर्षांत अर्थव्यवस्थेची प्रगती दीड पट गतीने प्रविण दरेकरांचा ‘रोखठोक’ प्रतिहल्ला
- पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरु, ३४ जागांसाठी २६८ उमेदवार रिंगणात ; सहा मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’