Karbi Anglong Agreement : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी झाली. करारानंतर अमित शहा म्हणाले की, आज ऐतिहासिक कार्बी आंगलोंग करार झाला आहे. मोदी सरकार दशके जुने संकट सोडवण्यासाठी व आसामची प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. Karbi Anglong Agreement Has Been Signed In Presence Of Union Home Minister Amit Shah
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी झाली. करारानंतर अमित शहा म्हणाले की, आज ऐतिहासिक कार्बी आंगलोंग करार झाला आहे. मोदी सरकार दशके जुने संकट सोडवण्यासाठी व आसामची प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
ते म्हणाले की, हा दिवस आसाम आणि कार्बी प्रदेशाच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आज 5 हून अधिक संघटनांचे सुमारे 1000 कार्यकर्ते शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. ते म्हणाले की, कार्बी आंगलोंगच्या संदर्भात आसाम सरकार पाच वर्षांत एका क्षेत्राच्या विकासासाठी 1000 कोटी रुपये खर्च करेल. नरेंद्र मोदी सरकारचे धोरण असे आहे की, आम्ही केलेल्या करारातील सर्व अटी आम्ही आमच्या वेळेत पूर्ण करतो.
करारामुळे प्रदेशात शांतता येईल : सीएम सरमा
याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, बोडो आणि कार्बी, आसाममधील दोन आदिवासी गट आसामपासून वेगळे होऊ इच्छित होते. बोडो करारावर 2009 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली आणि आसामची प्रादेशिक अखंडता राखताना विकासाचे नवीन मार्ग उघडले. कार्बी करार आज झाला. यामुळे कार्बी आंगलोंग परिसरात शांतता येईल.
सोनोवाल यांनी मानले पीएम मोदींचे आभार
यादरम्यान, आसामचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, दशकांपूर्वीचे संकट सोडवण्यासाठी वचनबद्ध असलेल्या ऐतिहासिक कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी केल्याबद्दल मी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानतो. आसामची अखंडता राखल्याबद्दल मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचेही आभार मानू इच्छितो. आजच्या करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धाडसी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांचाही हातभार लागला आहे.
ते म्हणाले की, माझा मुंबईत तीन दिवसांचा कार्यक्रम होता, पण मला कळले की येथे एक महत्त्वाचे काम होणार आहे. म्हणून मी करारामुळे तेथील माझी भेट रद्द केली.
कार्बी आसामचा एक प्रमुख जातीय समूह
कार्बी हा आसामचा एक प्रमुख जातीय समूह आहे. यात अनेक गट आहेत. कार्बी समूहाचा इतिहास 1980 च्या दशकाच्या सुरुवातीपासून खून, जातीय हिंसा, अपहरण आणि कर आकारणीशी संबंधित आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी करारानंतर सांगितले की, नवीन कराराअंतर्गत भारतीय संविधानाच्या अनुसूची 6 नुसार डोंगराळ जमातीतील लोकांना आरक्षणाचा हक्क मिळेल.
फेब्रुवारीमध्ये हजारो अतिरेक्यांनी शस्त्रे टाकली
या वर्षी फेब्रुवारीमध्येही, पाच संघटनांमधील 1,040 कार्बी अतिरेक्यांनी मुख्य प्रवाहात परतण्यासाठी आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमोर शस्त्रे ठेवली. कार्बी लोंगरी (पीडीसीके), कार्बी लोंगरी एनसी हिल्स लिबरेशन फ्रंट (केएलएनएलएफ), कार्बी पीपल्स लिबरेशन टायगर (केपीएलटी), कुकी लिबरेशन फ्रंट (केएलएफ) आणि युनायटेड पीपल्स लिबरेशन आर्मी (यूपीएलए) अशी या उग्रवादी संघटनांची नावे आहेत.
Karbi Anglong Agreement Has Been Signed In Presence Of Union Home Minister Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाची सीबीआयवर नाराजी, आतापर्यंत किती खटले प्रलंबित, किती खटल्यांत शिक्षा झाली, अहवाल सोपवण्याचे निर्देश
- Tokyo Paralympics : टोकियोत भारतीय कलेक्टरची कमाल, मेडल पक्के; जाणून घ्या कोण आहेत सुहास यथिराज!
- झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी रूमची सोय, भाजप नेते म्हणाले – हनुमान चालिसासाठीही मिळावी जागा
- पीएम मोदी या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता, जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर होणार पहिली भेट
- तालिबान सरकारच्या स्थापनेपूर्वी ISI प्रमुख काबूलला पोहोचले, पाकिस्तानी राजदूताला भेटण्याचे निमित्त