• Download App
    'जम्मू -काश्मीरला सुरक्षा पुरवण्यात केंद्र अपयशी, राज्यात विकास कुठे?' सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर कपिल सिब्बल यांचा सवाल । Kapil sibal Criticizes mohan bhagwat says centre failed to secure jammu kashmir

    ‘जम्मू -काश्मीरला सुरक्षा पुरवण्यात केंद्र अपयशी, राज्यात विकास कुठे?’ सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर कपिल सिब्बल यांचा सवाल

    Kapil sibal Criticizes mohan bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी सवाल केला आहे की, जम्मू -काश्मीरमध्ये काय विकास झाला आहे? केंद्र सरकार राज्याला सुरक्षित करण्यात अपयशी ठरले आहे. Kapil sibal Criticizes mohan bhagwat says centre failed to secure jammu kashmir


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी सवाल केला आहे की, जम्मू -काश्मीरमध्ये काय विकास झाला आहे? केंद्र सरकार राज्याला सुरक्षित करण्यात अपयशी ठरले आहे.

    तत्पूर्वी, नागपूर येथे आदल्या दिवशी मोहन भागवत म्हणाले होते की, जम्मू -काश्मीरमधील कलम 370 हटवल्याने सर्वांसाठी विकासाचा मार्ग खुला झाला आहे. पूर्वी जम्मू आणि लडाखमध्ये 370 मुळे भेदभाव होता, आता तो भेदभाव नाही. काश्मीर खोरेही आता थेट विकासाचा फायदा घेत आहे.

    सिब्बल म्हणाले, ‘मला भागवतजींनी फेब्रुवारी 2018 मध्ये काय सांगितले याची आठवण करून द्यायची आहे. ते म्हणाले की, लष्कर तयार होण्यासाठी अनेक महिने लागतात, पण आरएसएस सीमेवर जाऊन 3 दिवसांत लढण्यासाठी सज्ज होऊ शकते. आरएसएस नेत्यांनी असे विधान कधीही करू नये. भागवतजी म्हणाले की, ते 3 दिवसांत तयार होऊ शकतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. 2018 ला तीन वर्षे झाली. तुम्ही तयार होऊन सीमेवर का जात नाहीत? जेव्हा अशा पदावर असलेले भागवतजी असे वक्तव्य करतात, तेव्हा काही अर्थ असावा, एक प्रकारचा प्रामाणिकपणा असावा. त्यांनी त्यांच्या विधानाचा आदर केला पाहिजे.

    काश्मीरमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करताना सिब्बल म्हणाले, “आम्ही नऊ लोकांना सलाम करतो ज्यांनी आमच्यासाठी आपले प्राण दिले. आम्ही आमची मुले दहशतवाद्यांमुळे गमावली. मोहन भागवत कोणत्या विकासाबद्दल बोलत आहेत? दहशतवाद डोके वर काढत आहे, तर यूपीए सत्तेत असताना पुंछमध्ये अशा गोष्टी कधीच घडल्या नाहीत. भागवतजी म्हणतात की, जम्मू -काश्मीरमध्ये खूप विकास झाला आहे. तो विकास काय आहे आणि तो जमिनीवर कोठे आहे हे आम्हाला पाहायचे आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले होते की कलम 370 रद्द केल्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी त्या वचनबद्धतेचा सन्मान केला नाही, कारण त्यांना माहिती आहे की, जम्मू -काश्मीरमध्ये काहीही सामान्य नाही.

    Kapil sibal Criticizes mohan bhagwat says centre failed to secure jammu kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!