विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसमधल्या गांधी परिवारा विरोधात आवाज उठवणार्या कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध गांधी परिवार निष्ठ नेत्यांचे आवाज आता बुलंद झाले आहेत. कपिल सिब्बल यांनी गांधी परिवाराला बाजूला होऊन काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देण्याची मागणी केल्यानंतर त्या मागणीवर अंमलबजावणी करणे सोडाच, उलट कपिल सिब्बल यांच्याच विरोधात गांधींनी निष्ठ नेत्यांचे आवाज बुलंद होत आहेत.Kapil Sibal Congress: Voices of Gandhi loyalty are raised against Kapil Sibal who is raising voice against Gandhi family
कपिल सिब्बल यांच्या विरोधात आवाज उठवण्याची सुरुवात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. कपिल सिब्बल यांना अशोक गहलोत यांनी काँग्रेस परिवारा बाहेरचे ठरवून टाकले. कपिल सिब्बल हे पक्षातून पक्षात बाहेरून आले आहेत. त्यांचा काँग्रेसशी काही संबंध नव्हता. सोनिया गांधी यांच्या कृपेने आणि राहुल गांधी यांच्या पाठिंब्याने त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले होते. त्यांच्या सूचनेकडे पक्षाने लक्ष देण्याची गरज नाही, असे अशोक गेहलोत म्हणाले.
त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या नेत्यांनी कपिल सिब्बल यांच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला.
कपिल सिब्बल यांच्या हकालपट्टीची मागणी
या सर्व नेत्यांच्या पलीकडे जाऊन छत्तीसगडचे मंत्री टी. एस. सिंगदेव यांनी कपिल सिब्बल यांना काँग्रेसमधून हाकलून द्यावे, अशी मागणी केली आहे. काँग्रेसमध्ये सहिष्णुता आहे. काँग्रेस नेतृत्व सहनशील आहे म्हणूनच कपिल सिब्बल यांची टीका ऐकून घेतली गेली. परंतु, माझ्या वैयक्तिक मतानुसार त्यांना पक्षाने त्यांची पक्षाने हकालपट्टी केली पाहिजे. कारण त्यांचे वक्तव्य बेशिस्तीचे निदर्शक आहे, असा टोला सिंग यांनी कपिल सिब्बल यांना लगावला आहे.
5 प्रदेशाध्यक्षांना शिक्षा
उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला तरी देखील उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचा अभिनंदन करण्याचा ठराव मांडण्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ठरविले आहे. एकीकडे पाचही राज्यांमधल्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रियांका गांधी यांचा अभिनंदनाचा ठराव संमत करणार आहे आणि आता काँग्रेसमध्ये मूलभूत सुधारणा करण्याची मागणी करणारे कपिल सिब्बल यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी काँग्रेसमध्ये मूळ धरू लागली आहे.
Kapil Sibal Congress: Voices of Gandhi loyalty are raised against Kapil Sibal who is raising voice against Gandhi family
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी, शिवसेनेचा अपशकून असूनही गोव्यात पर्रीकरांवरून अधिक यश, नितीन गडकरी यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
- Anil Deshmukh 100 cr. : ठाकरे – पवार सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुखांना क्लिन चिट मिळण्याची शक्यता
- चांदिवाल आयोग अनिल देशमुख यांना क्लीन चिट देणार, पण ईडीच्या फेऱ्याचे काय होणार
- काँग्रेसचे मुख्यमंत्री बघेल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला अन् म्हणाले, फक्त हिंसा व अर्धसत्य दाखविले..!