शनायाने राकेश कटवे याला ठार मारले आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या हत्येप्रकरणी आणखी चार जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. Kannada actress Shanaya Katve arrested in brother’s murder case, body parts found on road
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी आली आणि एकच खळबळ उडाली. आपल्या भावाच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला हुबळी पोलिसांनी अटक केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनायाने राकेश कटवे याला ठार मारले आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या हत्येप्रकरणी आणखी चार जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
राकेश काटवेचे डोके देवरागुडीहलच्या जंगलात सापडले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश काटवेचे डोके देवरागुडीहलच्या जंगलात सापडले होते, तर मृतदेहाचे उर्वरित तुकडे हुबळी आणि गाडाग रोडवर सापडलेत. धारवाड जिल्हा पोलिसांनी नियाज अहमद कटिगार, तौसिफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवाले यांच्यासह आणखी चार संशयित आरोपींची ओळख पटवली .
राकेशची 9 एप्रिल रोजी राहत्या घरात हत्या
राकेशची 9 एप्रिल रोजी राहत्या घरात हत्या करण्यात आली. त्या काळात शनाया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळीला गेली होती. त्याचवेळी आरोपींनी राकेशला चाकूने ठार मारले. नियाज अहमद आणि बाकीच्या लोकांनी एक दिवसानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर शहरातील अनेक भागात ते फेकून दिले.
शनायाला अटक
त्यानंतर शनायाला तिच्या भावाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Kannada actress Shanaya Katve arrested in brother’s murder case, body parts found on road
महत्त्वाच्या बातम्या
- विवाहानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत पती–पत्नीची सोनेरी कामगिरी, विश्वकरंडकात भारतास तीन सुवर्ण
- अमेरिकेत बिहार-झारखंडच्या डॉक्टरांनी सुरु केली टेलिमेडिसीन हेल्पलाइन सेवा, पाटण्याला औषधपुरवठाही
- देशात लशींचा खडखडाट, मर्यादित साठ्यांमुळे अनेक राज्यांसमोर आव्हानांचा डोंगर
- कोरोना लढ्यासाठी `गुगल`ची भारताला १३५ कोटींची मदत
- कोरोनाच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु