प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय पारितोषिक विजेते प्रख्यात अभिनेत्री कंगना राणावत अंदमानच्या सावरकर कोठडीत नतमस्तक झाली.कंगनाने परवाच नवी दिल्लीच्या कार्यक्रमात मनकर्णिका या सिनेमासाठी राष्ट्रीय पारितोषिक स्वीकारले. त्यानंतर काल ती अंदमानात दाखल झाली.Kangana Ranaut paid tribute to Veer Savarkar ji as she visited Cellular Jail at Kala pani in Andaman Nicobar Island
अंदमानात पोहोचल्यानंतर तिने प्रथम सेल्युलर जेलला भेट देऊन सावरकर कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. ती काही काळ तिथे ध्यानमग्न अवस्थेत बसली आणि सावरकर चरणी नतमस्तक झाली.
त्यानंतर तिने एक भावपूर्ण पोस्ट लिहिली. स्वातंत्र्य संग्रामातील खऱ्या नायकासमोर आपण नतमस्तक आहोत. ब्रिटिशांनी प्रचंड अत्याचार करूनही सावरकरांचा आवेश अभंग राहिला. त्यांची स्वातंत्र्य निष्ठा कधीचढळली नाही. जेव्हा अमानवी अत्याचारांनी कळस घातला गाठला होता,
तेव्हा सावरकरांच्या रूपात मानवी संवेदनांनी धैर्याने आणि स्वातंत्र्य निष्ठेनेही कळस गाठला. सावरकरांनी ब्रिटिशांच्या अत्याचारांना अत्यंत धैर्याने तोंड दिले. ब्रिटिश त्यांना एवढे घाबरत होते, की सावरकरांना त्यांनी साखळदंडाने जखडून ठेवले.
जणू काही ते या छोट्याशा बेटावरून उडून हा प्रचंड समुद्र उल्लंघून जातील अशी भीती त्यांना वाटत होती. सावरकरांच्याचकष्टामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. परंतु, आमच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये हा दैदिप्यमान इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही,
असे कंगनाने पोस्टमध्ये लिहिले आहे.कंगनाने आपल्या ट्विटर हँडलवर सावरकर कोठडीतले आपले फोटो शेअर केले आहेत. त्याला नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणावर लाईक्स देऊन उत्तम प्रतिसादही दिला आहे.
Kangana Ranaut paid tribute to Veer Savarkar ji as she visited Cellular Jail at Kala pani in Andaman Nicobar Island
महत्त्वाच्या बातम्या
- लोकल गुरुवारपासून सुसाट धावणार, १०० टक्के फेऱ्या सुरु होणार; प्रवाशांना मोठा दिलासा
- गृहराज्यमंत्री देसाई यांचा पोलिस ठाण्यामध्ये प्रवेश पोलिसांची झाडाझडती, आरोपी शोधण्याचे आदेश
- ‘स्पेशल २६’ लवकरच रिलीज करतोय – नवाब मलिक
- टाटा कंपनीचे १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क; महामार्गावर सुद्धा योजना
- माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यन खानची ड्रग्जची केस मुंबई हायकोर्टात लढणार