• Download App
    अजून एक काश्मिर तयार होतोय... प.बंगाल निवडणूकीच्या निकाल पाहून कंगनाचा हल्लाबोल Kangana Ranaut angry after West Bengal result

    अजून एक काश्मिर तयार होतोय…! बांग्लादेशी आणि रोहिंग्या हीच ममतांची सर्वात मोठी ताकद;कंगनाचा हल्लाबोल

    ”ममता बॅनर्जी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांमुळे जिंकल्या असल्याचं कंगनाने म्हटलं आहे. Kangana Ranaut angry after West Bengal result

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई:  देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. आज निवडणूकानंतर मतमोजणी सुरू असून निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री कंगना राणौतने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.

    कंगनाने ट्विट करत तिचं मत व्यक्त केलंय. देशात अजून एक काश्मिर तयार होत असल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे.

    आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, ‘बांग्लादेशी आणि रोहिंग्या हीच ममताची सर्वात मोठी ताकद आहे. आणि जो ट्रेंड आहे त्यावरुन तर असंच दिसत आहे की तिथे हिंदू बहुसंख्य नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, बंगाली मुस्लिम हा भारतातला सर्वाधिक गरीब आणि वंचित घटक आहे. छान, अजून एक काश्मिर तयार होत आहे’. कंगनाचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या ट्विटवर कमेंट्स केल्या आहेत.

    या ट्विटच्या माध्यमातून कंगनाने ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2021च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कंगना रणौत सतत आपलं मत व्यक्त करताना दिसली. कंगनाचा आगामी सिनेमा तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित आहे. ‘थलायवी’ असं या सिनेमाचं नाव असून याव्यतिरिक्त कंगना ‘धाकड’ आणि ‘तेजस’ सारख्या सिनेमांमध्ये दिसणार आहे.

    Kangana Ranaut angry after West Bengal result

    Related posts

    Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; वैद्यकीय कारणास्तव पदत्याग

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा

    “पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!