अभिनेत्री कंगना रनौटने फाळणीवरून कॉंग्रसेवर निशाणा साधला आहे. फाळणीमुळे लाखो लोकांचे प्राण गेले. ब्रिटिश किंवा कॉँग्रेस ज्यांनी फाळणीला सहमती दिली त्यांना हत्याकांडासाठी जबाबदार धरण्यात आले होते का? असा सवाल केला आहे.Kangana now targets Congress over partition, was the British or Congress held responsible for the killings of those who lost their lives?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौटने फाळणीवरून कॉँग्रसेवर निशाणा साधला आहे. फाळणीमुळे लाखो लोकांचे प्राण गेले. ब्रिटिश किंवा कॉँग्रेस ज्यांनी फाळणीला सहमती दिली त्यांना हत्याकांडासाठी जबाबदार धरण्यात आले होते का? असा सवाल केला आहे.
कंगनाने एका मुलाखतीतभारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर टीका झाल्यावर कंगनाने इन्स्टाग्रामवर बीबीसी न्यूजची एक जुनी बातमी शेअर केली आहे. त्यासोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये कंगनाने म्हटले आहे की, २०१५ ला बीबीसीने हा लेख प्रकाशित केला आहे. यात लेखात असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, ब्रिटनने भारताला कोणतीही भरपाई देणे आवश्यक नाही. मग गोरे साम्राज्यवादी किंवा त्यांचे समर्थक का आणि कशासाठी अशा मूर्ख गोष्टी लिहू शकतात? जर तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर टाइम्स नाऊ समिटमध्ये केलेलं वक्तव्य हे याचं उत्तर आहे.
कंगनाने म्हटले आहे की, सिरिल रॅडक्लिफ हा गोरा इंग्रज जो यापूर्वी भारतात कधीच आला नव्हता. त्याला ब्रिटिशांनी अवघ्या ५ आठवड्यात फाळणी करण्यासाठी आणले होते. काँग्रेस आणि मुस्लीम लीग या समितीचे सदस्य होते. त्यांनी ब्रिटिशांच्या अटींनुसार फाळणी मान्य केली. त्यामुळे लाखो लोकांचे प्राण गेले. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? या हत्याकांडासाठी ब्रिटिश किंवा ज्या काँग्रेसने या फाळणीला सहमती दिली होती त्यांना जबाबदार धरण्यात आले होते का?
कंगना म्हणाली, कारण भारतात घडलेल्या अगणित गुन्ह्यांसाठी आपल्या राष्ट्र निर्मात्यांनी इंग्रजांना दोष दिला नाही. त्यांनी देशाच्या मालमत्तेची लूट केली आणि आपल्या देशाची दोन तुकड्यांमध्ये विभागणी करण्यासाठी आमच्या स्वातंत्र्यसैनिकांची हत्या केली. दुसºया महायुद्धानंतर ब्रिटीशांनी स्व:इच्छेने भारत सोडला. त्यानंतर विंस्टन चर्चिल यांनी स्वत:ला एक युद्ध नायक म्हणून दाखवले. पण ही तीच व्यक्ती होती जी बंगलाच्या दुष्काळासाठी जबाबदार होती. स्वतंत्र भारतात त्याच्या गुन्ह्याबद्दल त्याला कधीही शिक्षा झाली का?
Kangana now targets Congress over partition, was the British or Congress held responsible for the killings of those who lost their lives?
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!