प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज 5 जून पर्यंत जागतिक पर्यावरण दिवस. या निमित्ताने पर्यावरण बचावासाठी भारताने किती आणि कसे सकारात्मक प्रयोग आणि प्रयत्न केले आहेत, याची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विशद केली आहेत. अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांनी सुरू केलेल्या “माती वाचवा” उपक्रमात पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सहभागी झाले होते. आपल्या भाषणात मोदींनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली आहे. June 5: How and where is India at the forefront of environmental protection ?; Prime Minister Modi recited Panchsutra !!
– पंतप्रधान मोदी म्हणाले :
– भारत आणि आजच्या पर्यावरण दिनी एक महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे आहे ती म्हणजे भारत आणि पेट्रोल मध्ये दहा टक्के इथेनॉल ब्लेल्डिंगचे लक्ष पूर्ण केले आहे. यामुळे 26 % कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे , तर भारतीय शेतकऱ्यांच्या आमदनीत 40 % नी वाढ झाली आहे. 2014मध्ये पेट्रोलच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल बिल्डिंग चे प्रमाण 1% टक्का होते. निर्धारित वेळेत आधी 5 महिने भारताने 10 % इथेनॉल ब्लेंल्डिंगचे लक्ष पूर्ण केले आहे.
– भारताची सौर ऊर्जा क्षमता तब्बल 18 पटींनी वाढली आहे हायड्रोजन मिशन आणि सर्क्युलर इकॉनॉमिक पॉलिसीचे हे परिणाम आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी भारताची प्रतिबद्धता दृढमूल झाली आहे.
– भारताने installed Power Generation capacity का 40% non-fossil-fuel based sources लक्ष निर्धारित केले होते हे लक्ष्य देशाने ठरविलेल्या वेळेपेक्षा 9 वर्षे आधीच पूर्ण केले आहे.
– भारताने 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर पडीक – नापिक जमीन पुन्हा सुपीक करण्याचा निर्धार केला आहे त्यादृष्टीने काम सुरू आहे. शेतीमध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आणि अवजारे वापराचा सरकारचा प्रयत्न आहे. सौर उर्जेवर आधारित अवजारे उत्पादनाचाही सरकार विचार करत आहे.
– गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांमध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन नैसर्गिक शेतीचा मोठा कॉरिडोर बनविण्यासाठी केंद्रीय बजेट मध्ये तरतूद केली आहे. गंगेच्या किनाऱ्यावरील गावांमधील शेती पूर्णपणे रसायनमुक्त असेल. त्याची संपूर्ण अर्थरचना निसर्गावर केंद्रित आणि आधारित असेल. यामुळे नमामि गंगे सारख्या अभियानाला देखील मोठे बळ प्राप्त होणार आहे
June 5: How and where is India at the forefront of environmental protection ?; Prime Minister Modi recited Panchsutra !!
महत्वाच्या बातम्या
- MPSC नोकरीची संधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1085 रिक्त जागांसाठी भरती
- पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!
- ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!!
- सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!