विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – पंतप्रधान इम्रान खान हे आतापर्यंतचे सर्वांत असहाय्य पंतप्रधान असून पाकिस्तानात पत्रकारांसाठी भयाचे वातावरण निर्माण होत आहे, अशी टीका वरीष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी केली आहे.
‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीतदरम्यान हमीद मीर म्हणाले पाकिस्तानमध्ये माध्यम स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. देशात लोकशाही केवळ नावालाच शिल्लक आहे,’ असे ते म्हणाले. Journalist Hamid Mir targets Pak PM
‘टॉक शो’मधून काढून टाकण्यास इम्रान खान हे थेटपणे जबाबदार असतील असे मला वाटत नाही. पूर्वीच्या अनेक पंतप्रधानांप्रमाणेच ते असहाय्य असून मला कोणतीही मदत करू शकत नाहीत. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे देशातील गुप्तचर संस्थांचाच हात आहे.
थेट प्रक्षेपण सुरु असलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार टीका केल्यानंतर मीर यांना कॅमेरासमोर येण्यास नुकतीच मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पत्रकार असाद अली तूर याच्यावर इस्लामाबादमध्ये तीन जणांनी हल्ला केला होता.
त्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हमीद मीर यांनी पाकिस्तानी सैन्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे जिओ वाहिनीवरील त्यांच्या प्रसिद्ध टॉक शोमधून त्यांना दूर करण्यात आले होते.
Journalist Hamid Mir targets Pak PM
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तराखंडच् दुर्गम खेड्पाड्यात मध्ये आता चक्क मोटारीतून होणार न्यायदान, ई-न्यायालयाचा देशातील पहिलाच प्रयोग
- देशातील सर्वांत श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुब्बरेड्डी यांची निवड
- मदरशांसह सर्व धार्मिक अल्पसंख्याक शाळांना आरटीई कक्षेत आणण्याची केंद्राकडे शिफारस
- कर्नाटकात भाजप, संघ कार्यकर्त्यांवरील खटले सरकार मागे घेणार
- चीनने दोनदा scuttle केलेला सागरी सुरक्षेचा विषय भारताने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीच्या अजेंड्यावर आणला कसा…?? वाचा…!!