• Download App
    काठमांडूत राहुल गांधी मैत्रिणीच्या लग्नाच्या पार्टीत सामील; काँग्रेस कडून खुलासा!!Join Rahul Gandhi Maitrini's wedding party in Kathmandu

    Rahul Gandhi : काठमांडूत राहुल गांधी मैत्रिणीच्या लग्नाच्या पार्टीत सामील; काँग्रेस कडून खुलासा!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नेपाळची राजधानी काठमांडू येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे एका पार्टीत दिसले. त्यांच्या बरोबर चिनी राजदूत याहू हाऊ यान्की दिसल्या होत्या. या पार्टीचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभर त्याची वेगळी चर्चा सुरू झाली. Join Rahul Gandhi Maitrini’s wedding party in Kathmandu

    परंतु आता या पार्टी वर काँग्रेसकडून प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी खुलासा केला असून राहुल गांधी आपली पत्रकार मैत्रिण सुम्निना उदासच्या लग्नाच्या पार्टीत हजर राहण्यासाठी काठमांडूला गेले होते, असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे. लग्नाच्या पार्टीला हजर राहणे हा काही गुन्हा नाही. पण कदाचित इथून पुढे भाजपच्या राज्यात लग्नाच्या खासगी पार्टीला उपस्थित राहणे गुन्हा ठरू शकतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

    सुम्निना उदास सीएएन इंटरनॅशनल मध्ये संपादक म्हणून कार्यरत होती. तिचे वडील भीम उदास हे नेपाळचे म्यानमारमधील राजदूत आहेत.

    राहुल गांधींचे पार्टीतले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मी त्यातले तथ्य तपासले आणि ते मित्राच्या लग्नाच्या पार्टीला गेले असल्याचे स्पष्ट झाले. लग्नाच्या पार्ट्या आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तो गुन्हा नाही हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो सांगतो, असे रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

    Join Rahul Gandhi Maitrini’s wedding party in Kathmandu

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- करूर चेंगराचेंगरीची निष्पक्ष चौकशी व्हावी; पर्यवेक्ष समितीत तामिळनाडूचा मूळ रहिवासी नसण्याचा पुन्हा आदेश

    Ashwini Vaishnaw : रेल्वेने या वर्षी 3.02 कोटी बनावट-IRCTC खाती बंद केली; अश्विनी वैष्णव म्हणाले- काळाबाजार रोखण्यासाठी OTP; यामुळे 65% प्रकरणांमध्ये सुधारणा

    Zubeen Garg : गायक जुबीन गर्ग प्रकरणात 3500 पानांचे आरोपपत्र दाखल; पुरावे चार ट्रंकमध्ये भरून न्यायालयात आणले