Johnson And Johnson : अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोनाविरोधी लसीसाठी भारतात लवकर मंजुरीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. कंपनीने या घडामोडीमागील कारण जाहीर केलेले नाही. भारतीय औषध नियामक DCGI ने सोमवारी ही माहिती दिली. जॉन्सन अँड जॉन्सनने यावर्षी एप्रिल महिन्यात भारतात आपल्या लसीच्या चाचण्यांसाठी अर्ज केला होता. Johnson And Johnson Withdraws Its Application For Coronavirus Vaccine In India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोनाविरोधी लसीसाठी भारतात लवकर मंजुरीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. कंपनीने या घडामोडीमागील कारण जाहीर केलेले नाही. भारतीय औषध नियामक DCGI ने सोमवारी ही माहिती दिली. जॉन्सन अँड जॉन्सनने यावर्षी एप्रिल महिन्यात भारतात आपल्या लसीच्या चाचण्यांसाठी अर्ज केला होता.
याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. भारत सध्या दुष्परिणामांपासून संरक्षणाच्या मुद्द्यांवर लस उत्पादकांसमवेत कायदेशीर आव्हानांचा सामना करत आहे. आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी पूर्वी म्हटले होते की, लस उत्पादकांशी चर्चा करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. हे मुद्दे फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्याबाबत आहेत.
दरम्यान, भारतात आतापर्यंत चार कोरोनाविरोधी लसींच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये भारत बायोटेकची स्वदेशी लस Covaxin, Oxford-AstraZeneca ची Covishield, रशियाची Sputnik V आणि Modernaच्या लसीचा समावेश आहे. अमेरिकन कंपनी मॉडर्नाच्या लसीला DCGI ने जूनमध्येच आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती.
Johnson And Johnson Withdraws Its Application For Coronavirus Vaccine In India
महत्त्वाच्या बातम्या
- सहाव्या निकाहच्या तयारीत असलेल्या यूपीच्या माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल, तिसऱ्या पत्नीने तीन तलाकवरून पोलिसांत घेतली धाव
- सांगलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला व्यापाऱ्यांकडून रोखण्याचा प्रयत्न, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
- पंतप्रधान मोदींनी देशात e-RUPI सेवेची केले लोकार्पण, टारगेटेड- ट्रान्सपरंट कॅशलेस पेमेंटला मिळणार चालना
- मुंबईत ‘अदानी एअरपोर्ट’वर भडकली शिवसेना, शिवसैनिकांनी अदानी ब्रँडिंगची केली तोडफोड
- मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा : म्हणाले- कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही, पण पूरग्रस्तांना वाऱ्यावरही सोडणार नाही, वाचा सविस्तर..