• Download App
    भारतात जुलैपासून मिळू शकते सिंगल डोस Johnson & Johnson ची लस, एवढी असेल किंमत । Johnson and Johnson Corona Vaccine likely to be available in india From July, know about pricing

    Corona Vaccine : भारतात जुलैपासून मिळू शकते सिंगल डोस Johnson and Johnson ची लस, एवढी असेल किंमत

    Corona Vaccine : 21 जूनपासून देशातील प्रत्येकासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सध्या देशात फक्त सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक लस उपलब्ध आहे. परंतु पुढच्या महिन्यापासून जॉन्सन आणि जॉन्सनची कोरोनावरील लस देशात उपलब्ध होऊ शकेल. यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. Johnson and Johnson Corona Vaccine likely to be available in india From July, know about pricing


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 21 जूनपासून देशातील प्रत्येकासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सध्या देशात फक्त सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक लस उपलब्ध आहे. परंतु पुढच्या महिन्यापासून जॉन्सन आणि जॉन्सनची कोरोनावरील लस देशात उपलब्ध होऊ शकेल. यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

    खासगी क्षेत्र करणार लस खरेदी

    जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लस खासगी क्षेत्रातून देशात खरेदी केली जाईल. खासगी क्षेत्र ही लस अत्यंत कमी प्रमाणात खरेदी करेल. अशा परिस्थितीत ही लस खासगी रुग्णालयातच उपलब्ध होईल. सरकारच्या खरेदीबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण नाही. देशातील कोरोनाविरुद्ध सरकारी लसीकरण प्रामुख्याने कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनद्वारे चालू आहे.

    लस थेट कंपनीकडून खरेदी केली जाईल

    असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्सच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लस थेट जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून घेतली जाईल. ही लस जुलैपर्यंत देशात उपलब्ध होऊ शकते. सुरुवातीला या लसीचे केवळ 1000 डोस उपलब्ध होतील.

    एवढी असेल किंमत

    जॉन्सन आणि जॉन्सनची कोरोना लस देशामध्ये 25 डॉलर म्हणजेच जवळपास 1,850 रुपयांना उपलब्ध होऊ शकते. या लसीची खास बाब लसीचा एकच डोस आहे. या लसीचा एकदा डोस घेतल्यावरही कोरोनाविरोधी प्रतिकारक्षमता विकसित होते.

    देशातील 31.5 कोटी लोकांचे लसीकरण

    आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील 31.5 कोटी लोकांना कोरोना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. जरी हा देशाच्या लोकसंख्येचा एक छोटासा भाग असला तरी भारताच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. मूडीज आणि एस अँड पी सारख्या रेटिंग एजन्सींनी लसीकरणाच्या या संथ गतीस येत्या काळात अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका असल्याचे वर्णन केले. परंतु 21 जूनपासून लसीकरणाने वेग पकडला असून पुढच्या पाच ते सहा महिन्यांत भारतातल्या किमान 80 टक्के जनतेचे लसीकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Johnson and Johnson Corona Vaccine likely to be available in india From July, know about pricing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य