विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी वेगवेगळ्या सात राज्यांमध्ये दंगली घडवल्या जिहादींनी आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्री निषेध करते हिंदूंचा!!, असे घडले आहे.Jihadi riots on ramnavmi in 7 states, but organisation of Islamic cooperation blamed it on hindus
ज्या देशाने सर्व धर्मसमभाव स्वीकारण्याचे धोरण अवलंबले त्या देशात ईद, गुड फ्रायडेच्या दिवशी सुट्टी असते मात्र रामनवमीच्या दिवशी सर्वांना सक्तीची सुट्टी नसते. ईद वा गुड फ्रायडेच्या दिवशी मुस्लिम वा ख्रिश्चन जमावावर दगडफेक झाल्याच्या दुर्दैवी घटनांबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? ऐकले नसेल कारण हिंदू समाजाने कधीही दुसऱ्या धर्मियांवर आक्रमक केले नाही. मागच्या आठवड्यात भारतात मोठ्या प्रमाणात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाला गालबोट लागले, देशभरात तब्बल ७ राज्यांत १२ जातीय दंगली झाल्या.
कोणत्या राज्यात उडाला भडका?
महाराष्ट्र
संभाजी नगर : दोन व्यक्तींमध्ये झालेल्या भांडणाने उग्र रूप धारण केले. पोलिसांच्या गाड्या जाळल्या. पोलीस अधिकारी जखमी झाले. तरीही हिमतीने त्यांनी दंगल आटोक्यात आणली. पण या दंगलीत बॉम्बचा वापर करण्यात आला. ४०० – ५०० अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. हे पेट्रोल बॉम्ब किराडपूर भागात आलेच कुठून?, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
जळगाव : शोभा यात्रेच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ४ लोक जखमी झाले आहेत तर ५० – ५५ लोकांना अटक करण्यात आली आहे.
मालाड : मालाडमधून निघालेल्या शोभायात्रेवर मालवणीत चप्पल आणि दगडांचा मारा करण्यात आला. हिंसे दरम्यान अल्लाह-हु-अकबरच्या घोषणा देण्यात आला. ४०० लोकांवर आरोप दाखल करण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल
हावडा : हावड्यात झालेल्या हिंसेसाठी ममता बॅनर्जी यांनी भाजपला जबाबदार धरले आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. हावड्यात सांप्रदायिक हिंसा झाली. यात १२ लोकांना अटक करण्यात आली तर कलम १४४ लागू करुन काही वेळासाठी इंटरनेट सेवा बंद केली होती.
डालखोला : डालखोल्यात झालेल्या हिंसेत एका युवकाचा मृत्यू झाला तर ५ – ६ पोलिस कर्मचारी जखमी झाले.
बंगाल मधल्या या दंगलींचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामध्ये सरळ सरळ जिहादी हातात शस्त्र आणि दगड घेऊन हल्ले करत आहेत हे दिसले. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मात्र मुस्लिम समुदाय रमजान रोजा आणि नमाजात मग्न होता, अशी मखलाशी केली आहे.
झारखंड
साहिबगंज : झारखंडच्या साहिबगंजमधील कृष्णानगरच्या कुलीपाडा भागात श्रद्धाळूंवर दगडफेक करण्यात आली. यातून पेटलेल्या हिंसेत एका बाईकला आग लावण्यात आली.
गुजरात
वडोदरा : गुजरातच्या वडोदरात इतर राज्यांप्रमाणे शोभायात्रेवर जमावाने दगडफेक केली. जवळपास ५०० लोकांवर केस दाखल करण्यात आली. एकूण २३ लोकांना अटक करण्यात आलेली असून यात ६ महिलांचा समावेश आहे.
कर्नाटक
हासन : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे होमटाऊन ३० मार्चला म्हणजेच गुरूवारी रामनवमीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीवर कट्टरपंथियांनी हल्ला केला होता. मशिदीच्या समोरून निघालेल्या या मिरवणुकीला विरोध करण्यासाठी तेथील जमावावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात चाकूचा वापर करण्यात आला होता ज्यामुळे २ इसम जखमी झाले आहेत.
बिहार
नालंदा : इथे शोभायात्रेवर आजुबाजूच्या घरातूंन आणि दुकानांतून दगडफेक करण्यात आली. झालेल्या हिंसेत गोळीबार करण्यात आला, ज्यात ४ जण जखमी झाले आहेत.
रोहतास – रोहतासमध्ये हिंसा इतकी चिघळली होती की, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले.
उत्तर प्रदेश
लखनऊ : लखनऊमध्ये सुद्धा शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. पोलिस फोर्स तातडीने आल्यामुळे या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही.
ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज
प्रत्येक राज्यातल्या दंगलीच्या कहाण्या वेगवेगळ्या आहेत, पण सूत्र एकच आहे. रामनवमीच्या मिरवणुकीवर जिहादी हल्ला. तरी देखील इस्लामी देशांची सर्वोच्च संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज याच्या मुख्यालयाने पत्र काढून भारतात रामनवमीच्या दिवशी मुस्लिमांना टार्गेट करण्यात आल्याचा आरोप करून या हिंसाचाराचा निषेध केला आहे. हिंदू जमावाने बिहार शरीफ मध्ये मदरसा आणि ग्रंथालय जाळण्याचा आरोप या पत्रकात केला आहे. पण मूळात भारताच्या अंतर्गत मामल्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज या संघटनेचा हा हस्तक्षेप आहे.
Jihadi riots on ramnavmi in 7 states, but organisation of Islamic cooperation blamed it on hindus
महत्वाच्या बातम्या
- सावरकर गौरव यात्रा : मी फडतूस नाही काडतूस, झुकेगा नही घुसेगा; देवेंद्र फडणवीसांचा प्रहार–
- ‘’उद्धव ठाकरे… फडतूस नही काडतूस हू मै, झुकेंगा नही साला घुसेंगा’’ देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा!
- Covid19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत करोना संसर्गाचे ७११ नवीन रुग्ण, चार जणांचा मृत्यू
- China Arunachal rename: चीनकडून कुरापती सुरूच; आता अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली!