• Download App
    JEE Main 2023 परीक्षा जानेवारीत; करा अर्ज; ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा JEE Main 2023 Exam in January

    JEE Main 2023 परीक्षा जानेवारीत; करा अर्ज; ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शैक्षणिक सत्र 2023 – 24 साठी जेईई मेन 2023 परीक्षेची अधिसूचनाा अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. यातील पहिले सत्र जानेवारी 2023 मध्ये तर दुसरे सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. यावर्षीदेखील जेईई मेनची संयुक्त प्रवेश परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे सोपवली आहे. JEE Main 2023 Exam in January

    NTA ने अधिसूचना जारी करत सांगितले आहे की, पहिल्या सत्राची परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवार, 15 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी परीक्षेत बसू इच्छिणारे विद्यार्थी एनटीए जेईई मेनच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

    • जेईई मुख्य परीक्षा 13 भाषांमध्ये

    जेईई मेन- 2023 परीक्षा भाषांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे.

    • सध्या तुम्ही पहिल्या सत्रासाठी अर्ज करु शकाल

    JEE Main-2023 च्या पहिल्या सत्रात, फक्त सत्र 1 दिसेल आणि उमेदवार त्याची निवड करु शकतात. पुढील सत्रात, सत्र 2 दिसेल आणि उमेदवार त्या सत्राची निवड करु शकतात.

    • महत्त्वाच्या तारखा

    ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात: 15 डिसेंबर 2022 चे 12 जानेवारी 2023 पर्यंत सकाळी 9 पर्यंत

    क्रेडिट/डेबिट कार्ड/ नेट बॅंकिंग/ UPI द्वारे अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2023 रात्री 11.50 पर्यंत

    परीक्षा केंद्र शहरांची घोषणा: जानेवारी 2023 चा दुसरा आठवडा

    NTA वेबसाइटवर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची उपलब्धता: जानेवारी 2023 चा तिसरा आठवडा

    जेईई मेनसाठी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या सत्राच्या तारखा: 24,25,27,28,29,30 आणि 31 जानेवारी 2023

    • जेईई मेनसाठी बोर्ड परीक्षेच्या पात्रतेमध्ये सूट

    JEE- Mains द्वारे NIT, TripleIT, GFTI मध्ये प्रवेश घेण्यासाठी बोर्डाच्या पात्रतेमध्ये यंदाही सूट देण्यास आली आहे. यंदाही बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जेईई – मेन रॅंकच्याआधारे एनआयटी, ट्रिपल आयटीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    JEE Main 2023 Exam in January

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य