वृत्तसंस्था
अमृतसर – पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांच्या बरसीला दरवर्षी प्रमाणे पंजाबमधला शीखांचा जथ्था पाकिस्तानात लाहोरला जाणार होता. पण कोविडचे कारण दाखवून पाकिस्तानी सरकारने त्यांना परवाना नाकारला आहे. jatha’ of 127 pilgrims was supposed to visit Lahore to observe Maharaja Ranjit Singh’s death anniversary
लाहोर ही महाराजा रणजित सिंगांची राजधानी. तेथे त्यांची समाधी आहे. दरवर्षी त्यांच्या बरसीला पंजाबमधून शीख भाविकांचा जथ्था लाहोरला जात असतो. यंदा १२७ शीखांचा जथ्था लाहोरला जाणार होता. तेथे त्यांचा ३० जून पर्यंत मुक्काम होता. या कालावधीत रणजित सिंगांच्या समाधी मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन होते.
परंतु, कोविडचे कारण दाखवून यंदा पाकिस्तान शीख गुरूव्दारा प्रबंधक कमिटीने पंजाबमधील शीख जथ्थ्याला पाकिस्तान सरकारने परवानगी नाकारल्याचे कळविले आहे. ही माहिती पंजाबच्या शिरोमणी गुरूव्दारा प्रबंधक कमिटीचे सरचिटणीस मोहिंदर अहली यांनी दिली आहे.