प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आहे. 26 जानेवारीला भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहोचेल आणि 30 जानेवारी रोजी भारत जोडो यात्रेची समारोपाची सभा असेल. पण त्या आधीच भारत जोडो यात्रेचा पुढचा टप्पा काँग्रेसने जाहीर केला आहे. January 26 to March 26; After Bharat Jodo, Congress announced a campaign to join hands
26 जानेवारी 2023 ते 26 मार्च 2023 या दोन महिन्यांमध्ये काँग्रेसने “हाथ से हाथ जोडो” असे हाताला हात जोडण्याचे अभियान जाहीर केले आहे. भारत जोडो यात्रेचा हा विस्तार असेल आणि हाताला हात जोडण्याच्या अभियानात भारत जोडो यात्रेचा राजकीय संदेश संपूर्ण देशात पोहोचविण्यात येईल, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी जाहीर केले आहे.
काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हाथ से हाथ जोड़ो अभियानात देशातल्या प्रत्येक परिवाराच्या घरी जाईल आणि त्यांना राहुल गांधींचे वैयक्तिक पत्र आणि केंद्रातल्या मोदी सरकारच्या असफलतेचे एक चार्जशीट सोपे सोपवेल. हाताला हात जोडण्याच्या अभियानात काँग्रेसचे कार्यकर्ते 2.50 ग्रामपंचायत क्षेत्र, 6 लाख गावे आणि 10 लाख मतदान केंद्रांपर्यंत पोहोचतील आणि काँग्रेसचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवतील.
त्याचवेळी या दोन महिन्यांमध्ये देशातल्या सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये फक्त महिलांची रॅली आणि पदयात्रा आयोजित केल्या जातील. या रॅली आणि पदयात्रांमध्ये देखील काँग्रेसचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे आकडे बोलतात
- हाथ से हाथ जोडो अभियान : 26 जानेवारी ते 26 मार्च 2023
- 2.5 लाख ग्राम पंचायती, 6 लाख गावे आणि 10 लाख मतदान केंद्रांपर्यंत काँग्रेसचा संदेश पोहोचवणार
- भारतातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील राजधान्यांमध्ये महिला यात्रा आणि पदयात्रा
January 26 to March 26; After Bharat Jodo, Congress announced a campaign to join hands
- 35000 संघ स्वयंसेवकांच्या तळजाई शिबिराला 40 वर्षे पूर्ण; “हिंदू सारा एक” दुमदुमला होता मंत्र!!
- एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार, संक्रांत गोड; महाराष्ट्र सरकारकडून 300 कोटी वितरित
- समाजवादी साथी, एक एक सोडून जाती!!
- एकीकडे काँग्रेसचा 21 पक्षांच्या एकजूटीचा “राष्ट्रीय घाट”, पण दुसरीकडे तांबे पिता – पुत्रांनी दाखवला “कात्रजचा घाट”!!