Jammu kashmir omar abdullah : जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर टीका करताना प्रश्न केलाय की, तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही, कृपया त्याबद्दल आम्हाला स्पष्ट करा. ते म्हणाले की, केंद्र तालिबानकडे कसे पाहते. तसेच त्यांनी ट्वीट करून दहशतवादी गटाशी बोलण्याचा आग्रह धरला. “जर ते दहशतवादी आहेत तर मग तुम्ही त्यांच्याशी का बोलत आहात? नसल्यास, तुम्ही (केंद्र) संयुक्त राष्ट्रांकडे जाल आणि ती एक दहशतवादी संघटना म्हणून सूचीतून वगळली जाईल का? आपले मत स्पष्ट करा.’ Jammu kashmir omar abdullah targeted central government taliban is a terrorist
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर टीका करताना प्रश्न केलाय की, तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही, कृपया त्याबद्दल आम्हाला स्पष्ट करा. ते म्हणाले की, केंद्र तालिबानकडे कसे पाहते. तसेच त्यांनी ट्वीट करून दहशतवादी गटाशी बोलण्याचा आग्रह धरला. “जर ते दहशतवादी आहेत तर मग तुम्ही त्यांच्याशी का बोलत आहात? नसल्यास, तुम्ही (केंद्र) संयुक्त राष्ट्रांकडे जाल आणि ती एक दहशतवादी संघटना म्हणून सूचीतून वगळली जाईल का? आपले मत स्पष्ट करा.’
उमर यांचे हे वक्तव्य कतारमध्ये भारताच्या राजदूतांनी तालिबानच्या विनंतीवरून शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजाई यांची भेट घेतल्यानंतर आले आहे.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा, तसेच सुरक्षित आणि जलद परतण्यावर चर्चा झाली. यादरम्यान अफगाणी नागरिक, विशेषकरून अल्पसंख्याक जे भारताचा प्रवास करू इच्छितात त्यांच्यावरही चर्चा झाली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार नवी दिल्ली आणि तालिबानमध्ये बैठकीचे आयोजन तालिबानच्या विनंतीनंतर करण्यात आले होते.
पंचायत निवडणुक न लढण्याची अब्दुल्लांना खंत
नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष आणि लोकसभा सदस्य डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी मंगळवारी सांगितले होते की, जर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या तर नॅशनल कॉन्फरन्स जम्मू -काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष असेल. त्यांनी (केंद्र) त्यांनी जे केले त्याबद्दल त्यांना जबाबदार धरले जाईल. त्यांना लोकांसाठी काम करायचे आहे. ते पुढे म्हणाले की, 2018 मध्ये पंचायत निवडणुका त्यांच्या पक्षाने लढवल्या नाहीत याची त्यांना खंत आहे.
Jammu kashmir omar abdullah targeted central government taliban is a terrorist
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या
- तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी
- मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका
- Fact Check : तालिबानने खरंच एकाला हेलिकॉप्टरला फाशी देऊन शहरावरून उडवले? वाचा, काय घडलंय नेमकं!
- No GST on Papad : ‘गोल पापडांवर जीएसटी नाही, पण चौकोनी पापडांवर लागू!’ हर्ष गोयंका यांच्या ट्विटवर आता CBIC चे स्पष्टीकरण