• Download App
    दिवाळीच्या शुभमुहूर्तावर काश्मीरमधले केशर उत्पादक खुश; केशराचे बंपर उत्पादन । Jammu and Kashmir | Saffron farmers of Pampore say timely rainfall and favourable weather has increased the production of saffron crop this year

    दिवाळीच्या शुभमुहूर्तावर काश्मीरमधले केशर उत्पादक खुश; केशराचे बंपर उत्पादन

    वृत्तसंस्था

    पंपोर : ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एकीकडे महागाईच्या बातम्या येत असताना जम्मू-काश्मीर मधले केशर उत्पादक मात्र यंदाच्या दिवाळीत खूश आहेत. कारण केशराचे बंपर उत्पादन झाले आहे. Jammu and Kashmir | Saffron farmers of Pampore say timely rainfall and favourable weather has increased the production of saffron crop this year

    गेल्या पाच सहा वर्षांमध्ये लहरी हवामान आणि पाऊस यामुळे केशराचे उत्पादन घटले होते. 2021 मध्ये मात्र हवामानाने आणि पावसाने कोणताही दगाफटका केला नाही. त्यामुळे केशराचे उत्पादन चांगले झाले, अशा भावना काश्मीरी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.



    काश्मीरच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 3700 हेक्‍टर जमिनीवर केशराची लागवड होते. आता केशर फुलांच्या तोडणीचा मोसम सुरू झाला आहे. त्यामुळे केशर उत्पादक शेतकऱ्यांनी ही कामे सुरू केली आहेत.

    यंदा बंपर उत्पादन झाल्याने संपूर्ण देशात आणि परदेशात उत्तम प्रतीचे भरपूर केशर पाठविता येईल अशी त्यांना आशा आहे. भरपूर उत्पादन झाले असले तरी केशराचे भाव पडता कामा नयेत याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशा भावनाही केशर उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

    Jammu and Kashmir | Saffron farmers of Pampore say timely rainfall and favourable weather has increased the production of saffron crop this year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य