jaish E Mohammad Terrorist : वादग्रस्त पुजारी स्वामी यति नरसिंहानंद यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. जान मोहम्मद डार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो काश्मीरमधील पुलवामाचा असून दिल्लीच्या पहाडगंजमधील हॉटेलमध्ये थांबला होता. jaish E Mohammad Terrorist Dar Arrested From Delhi Who Was Planning To Kill Swami Narsinhanand
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वादग्रस्त पुजारी स्वामी यति नरसिंहानंद यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. जान मोहम्मद डार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो काश्मीरमधील पुलवामाचा असून दिल्लीच्या पहाडगंजमधील हॉटेलमध्ये थांबला होता.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, जानन मोहम्मदकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की तो हिंदू धर्मगुरूचा वेश घेऊन जाणार होता आणि दासना येथील देवी मंदिरातील स्वामी यति नरसिंहानंद सरस्वती यांना ठार करणार होता. नरसिंहानंद यांनी नुकतेच इस्लाम धर्माबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले होते.
दिल्ली पोलिसांनी या दहशतवाद्याकडून केशरी कुर्ता, पांढरा पायजामा, कलावा, मणी, चंदन व कुमकुम असे साहित्य जप्त केले आहेत. दारच्या ताब्यातून पाइंट 30 बोअरची पिस्तूल आणि दोन मॅगझिन जप्त करण्यात आले असून त्यात 15 जिवंत काडतुसे आहेत. प्राथमिक चौकशीत जान मोहम्मद डारने म्हटले की, त्याला दहशतवादी संघटनेने पुजारीची हत्या करण्यास सांगितले होते.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, असे सांगितले जात आहे की जान मोहम्मद डार हा सुतार होता, तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आबिदच्या संपर्कात डिसेंबर 2020 मध्ये आला होता. पीओकेमध्ये राहून दहशतवादी कारवाया चालविणार्या आबिदने दारला दहशतवादी संघटनेत सामील होण्यास प्रेरित केले. असे सांगितले जाते की, 2 एप्रिल 2021 रोजी आबिदने अनंतनागमध्ये दारची भेट घेतली आणि त्याला स्वामी यति नरसिंहानंद सरस्वती यांना ठार मारण्याचे लक्ष्य दिले.
jaish E Mohammad Terrorist Dar Arrested From Delhi Who Was Planning To Kill Swami Narsinhanand
महत्त्वाच्या बातम्या
- Photos Cyclone Tauktae : चक्रीवादळ तौकतेने केला असा विध्वंस, या फोटोंमधून पाहा विविध शहरांचे हाल
- बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचार्याशी होते अवैध संबंध, कंपनीनेही चालवली होती चौकशी
- मोठी बातमी : चक्रीवादळ तौकतेच्या मार्गात ओएनजीसीची बोट अडकली, 273 जणांच्या बचावासाठी भारतीय नौसेनेची दोन जहाजे रवाना
- मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये
- मध्य प्रदेशात लॉकडाऊनचे नियम मोडल्यास ‘राम नाम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा