वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हिंसाचारग्रस्त जहांगीरपुरी भागातील अतिक्रमणविरोधी बुलडोजर कारवाई सुप्रीम कोर्टाने 2 आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. मात्र, त्याच वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी फक्त मुस्लिमांनाच बुलडोजर कारवाईत टार्गेट करण्यात आले, असा आरोप सुप्रीम कोर्टात फेटाळून लावला आहे. यासाठी त्यांनी खरगोन मधील कारवाईचे उदाहरण दिले आहे. खरगोन मध्ये फक्त मुस्लिमांवर कारवाई झाल्याच्या बातम्या आल्या. परंतु प्रत्यक्षात अतिक्रमणविरोधात बुलडोजर चालवताना 88 हिंदूच्या घरावर, तर 26 मुसलमानांच्या घरांवर बुलडोझर चालवल्याचे रिपोर्ट तुषार मेहतांनी सादर केले आहेत. Jahangirpuri Bulldozer Action in Jahangirpuri postponed for 2 weeks
सुप्रीम कोर्टाचे आज दोन्ही बाजूच्या वकिलांची जोरदार खडाजंगी झाली. जमियात उलमा ए हिंद या संघटनेने बुलडोजर कारवाई विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर जोरदार युक्तिवाद झाले. अतिक्रमणांचा विषय गंभीर आहे. परंतु, फक्त मुस्लिमांनाच यामध्ये टार्गेट करण्यात येत आहे. दिल्लीत 52 ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. परंतु त्यातल्या जहांगीरपुरीच्याच वस्तीला टार्गेट करण्यात आले आहे, असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला.
परंतु तुषार मेहता यांनी या आरोपाचे खंडन केले. जहांगीरपुरी विभागातील अतिक्रमणविरोधी कारवाई 31 जानेवारीपासून सुरू आहे. ती टप्प्याटप्प्याने पुढे नेण्यात येत आहे, याचे दाखले त्यांनी दिले आहेत. त्याच वेळी खरगोन मध्ये फक्त मुस्लिमांना टार्गेट केल्याच्या बातम्या आल्या. परंतु हिंदूंच्या घरांवर देखील बुलडोजर चालवण्याची उदाहरणे त्यांनी दिली. 88 हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चालवले तर 26 मुस्लिमांच्या घरांवर बुलडोजर कारवाई करण्यात आली, असे उदाहरण त्यांनी दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने न्यायाधीश नागेश्वर राव आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने फक्त जहांगीरपुरी भागातील अतिक्रमणविरोधी बुलडोजर कारवाईला स्थगिती दिली आहे. बाकीच्या शहरांमधल्या बुलडोजर कारवायांना स्थगिती दिलेली नाही.