वृत्तसंस्था
नवी दिल्ली: भारतीय कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हैया कुमार याने काँग्रेसचे समर्थन करतानाच भाजपवर हल्ला चढविला. यात काही विशेष घडले नाही. पण त्याने देशातल्या छोट्या प्रादेशिक पक्षांवर ही तितकाच तिखट हल्ला केला आहे.It’s country’s oldest and most democratic party, and I am emphasising on ‘democratic’…Not just me many think that country can’t survive without Congress.
काँग्रेसच्या बुडत्या जहाजाला वाचविले नाही तर छोट्या होड्या आणि नावांचा काही उपयोग होणार नाही, अशा शब्दांमध्ये त्याने देशातल्या प्रादेशिक पक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. शहीदे आझम भगतसिंग पार्कमध्ये राहुल गांधी आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासह त्याने भगतसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी कन्हैयाकुमार बोलत होता.
कन्हैया म्हणाला, की देशात भाजपची हिटलरशाही चालू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःचे कुटुंब सोडून इतरांची सेवा करायला सांगतो. काँग्रेस पक्ष कुटुंबियांना सोडून जा असे सांगत नाही. तो कुटुंबीयांसह देशाच्या सेवेत उतरतो. महात्मा गांधी यांनी कस्तुरबा गांधी यांच्यासह देशाची सेवा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील स्वत:चे कुटुंब वाऱ्यावर सोडले नाही, याची आठवण कन्हैया कुमारने संघाला करून दिली.
त्याच वेळी कन्हैयाकुमार अनेक प्रादेशिक पक्षांना त्यांच्या राजकीय खुजेपणाची जाणीव करून दिली. काँग्रेस हे मोठे जहाज आहे. देशातली लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला वाचविले पाहिजे. ती जर आपण टिकवू शकलो नाही तर छोट्या होड्या आणि नावांचा काही उपयोग होणार नाही, अशा शब्दात त्याने तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वायएसआर काँग्रेस या छोट्या प्रादेशिक पक्षांना त्यांचे नाव न घेता सुनावले. एक प्रकारे कन्हैया कुमारने आपण काँग्रेसमध्ये नेमके कशासाठी आलो हेच आजच्या भाषणातून सूचित केले आहे.
It’s country’s oldest and most democratic party, and I am emphasising on ‘democratic’…Not just me many think that country can’t survive without Congress.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-पुण्यात झोपडपट्ट्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रचार – प्रसार; मुख्यमंत्र्यांनी अमित शहांसमोर व्यक्त केली चिंता
- Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
- Nagpur Education Policy : NEPला RSS किंवा ‘नागपूर शिक्षण धोरण’ म्हटले तर आनंदच मुख्यमंत्री बोम्मई
- कोरोना कालावधीतील सरकारी खर्चावरील निर्बंध उठले, अर्थ मंत्रालयाच्या सूचना, विभाग आता बजेटच्या अंदाजानुसार खर्च करू शकतील
- ‘कोणीही टाळी वाजवली नाही’, चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या यूएनजीएच्या भाषणावर टोमणा, सिब्बल यांचीही टिप्पणी