प्रतिनिधी
मुंबई : इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात म्हणजेच इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये (ITBP) नोकरीची सुवर्ण संधी आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाने गट C मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2022 पा सून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार डिसेंबरपर्यंत recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटवर रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठीची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. ITBP Recruitment : Indo-Tibetan Border Police Force Recruitment Start, Apply
आवश्यक शैक्षणिक पात्रता
इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात ट्रेडसमन कॉन्स्टेबल भरती मोहिमेत एकूण 287 रिक्त जागांवर भरती होणार आहे, त्यापैकी 246 जागा कॉन्स्टेबल ट्रेड्समन (पुरुष) आणि 41 कॉन्स्टेबल ट्रेड्समन (महिला) साठी आहेत. कॉन्स्टेबल टेलर, गार्डनर आणि कॉबलर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागात आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तर कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी, वॉशरमॅन आणि बार्बर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दहावी शिक्षण पूर्ण झालेले असावे.
- या 287 रिक्त पदांवर होणार भरती
कॉन्स्टेबल टेलर : 18 पदं
कॉन्स्टेबल गार्डनर : 16 पदं
कॉन्स्टेबल मोची : 31 पदं
कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी 78 : पदं
कॉन्स्टेबल वॉशरमन : 89 पदं
कॉन्स्टेबल बार्बर : 55 पदं
वयोमर्यादा आणि वेतन
निवड प्रक्रियेमध्ये पीईटी/पीएसटी, लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असणार आहे. कॉन्स्टेबल, टेलर, गार्डनर आणि कॉबलर या पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 से 23 वर्षादरम्यान तर कॉन्स्टेबल, सफाई कर्मचारी आणि बार्बर पदासाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे. वरील पदांवर निवड झाल्यानंतर उमेदवारांना स्तर तीननुसार वेतन देण्यात येणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार, उमेदवाराला 21 हजार 700 ते 69 हजार 100 रूपयांपर्यंत वेतन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी https://itbpolice.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्या.
ITBP Recruitment : Indo-Tibetan Border Police Force Recruitment Start, Apply
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये पंपूर मधल्या शिव मंदिराचा होणार जीर्णोद्धार; अतिक्रमण हटवण्याचे महापौर याकूब मलिकांचे निर्देश
- ठाकरे – आंबेडकर – पवार एकत्र येण्याच्या नुसत्याच चर्चा, पण दलित पॅंथरचा एकनाथ शिंदेंना खुला पाठिंबा
- ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून बिस्मिल्ला ए रहमान ए रहीम म्हणत सुषमा अंधारेंनी समजावले इस्लामचे 5 फर्ज!