• Download App
    जगण्यासाठी आम्हाला धर्म बदलण्याची वेळ, दुचाकीवरून आलेल्या राज्यपालांसमोरच लोकांनी रडत सांगितली आपबिती|It was time for us to change our religion in order to survive, People cried in front of the governor who came on a two-wheeler

    जगण्यासाठी आम्हाला धर्म बदलण्याची वेळ, दुचाकीवरून आलेल्या राज्यपालांसमोरच लोकांनी रडत सांगितली आपबिती

    जगण्यासाठी आम्हाला धर्म बदलण्याची वेळ आली असल्याचे लोक राज्याच्या घटनात्मक प्रमुखासमोर म्हणतील अशी मी कल्पनाही केली नव्हती अशी खंत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदिप धनखड यांनी व्यक्त केली. निवडणूक निकालानांतर झालेल्या हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी गेल्यावर राज्यपालांच्या पायावर डोके ठेऊन अनेकांनी आपल्याला धर्म बदलण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.It was time for us to change our religion in order to survive, People cried in front of the governor who came on a two-wheeler


    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : जगण्यासाठी आम्हाला धर्म बदलण्याची वेळ आली असल्याचे लोक राज्याच्या घटनात्मक प्रमुखासमोर म्हणतील अशी मी कल्पनाही केली नव्हती अशी खंत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदिप धनखड यांनी व्यक्त केली.

    निवडणूक निकालानांतर झालेल्या हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी गेल्यावर राज्यपालांच्या पायावर डोके ठेऊन अनेकांनी आपल्याला धर्म बदलण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.



    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर प्रचंड हिंसाचार झाला होता. तृणमूल कॉँग्रेसचे गुंड निरपराधांना मारहाण करीत असताना पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

    त्यामुळे शेवटी राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून जगदिप धनखड यांनी हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमोर अनेकांनी आपली आपबिती सुनावली. अनेक हिंदू कुटुंबांनी राज्यपालांच्या पायावर पडून जगायचे असेल तर आम्हाला धर्म बदलण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. राज्यपाल म्हणाले स्वतंत्र भारतामध्ये हे दृश्य पाहावे लागेल याची मी कल्पानही केली नव्हती.

    राज्यपालांच्या दौºयात अनेक हिंदू कुटुंबांनी त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडल्यावर आपली पोलखोल होण्याच्या भीतीने आता त्यांचे दौरेही रोखण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

    कोरोनाच्या दुसºया लाटेच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपले दौरे रद्द करावेत अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिवांनी केल्याचे जगदिप धनखड यांनी सांगितले.

    पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील अनेक भागात पोहोचºयासाठी राज्यपालांनी दुचाकीचा वापर केला. आपल्या सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन त्यांनी दुर्गम भागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अनेक स्थानिकांशी संवाद साधला. आपण एका ज्वालामुखीच्या तोंडावर बसलो आहोत.

    तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांकडून विरोधकांचे खून पडत आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत. लूटमार केली जात आहे, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपाल म्हणाले आपण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सांगितले आहे की त्यांनी या घटनांची नोंद घ्यावी. लाखो लोकांना त्रास दिला जात आहे.

    It was time for us to change our religion in order to survive, People cried in front of the governor who came on a two-wheeler

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य