• Download App
    24 तास-13 मशिन-30 कर्मचारी.. अन् अत्तराचा फाया नव्हे नोटा नेण्यासाठी मागवले चक्क कंटेनर ....अबब हे फोटो पहाच...! IT RAID UTTAR PRADESH

    IT RAID UTTAR PRADESH : २४ तास-१३ मशिन-३० कर्मचारी.. अन् अत्तराचा फाया नव्हे नोटा नेण्यासाठी मागवले चक्क कंटेनर ….अबब हे फोटो पहाच…!

    विशेष प्रतिनिधी

    कानपूर: उत्तर प्रदेशातील सध्याची सर्वात मोठी बातमी म्हणजे कानपूर जिल्ह्यातील परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांच्यावरील आयटी रेड.त्यांचा मुलगा प्रत्युष जैन याला DGGI कोठडीत घेण्यात आले. टीम प्रत्युषला चौकशीसाठी सोबत घेऊन गेली . IT RAID UTTAR PRADESH

    प्रत्यक्षात आयकर विभागाने पीयूषच्या घरातून आतापर्यंत 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त अज्ञात रक्कम जप्त केली . नोटा मोजण्याची प्रक्रिया सकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे विभागाकडून नवीन 80 पेट्या मागविण्यात आल्या . यासोबतच एक कंटेनरही रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी मागविण्यात आले.

    डीजीजीआय टीमने पीयूष जैनच्या छुप्या ठिकाणी 40 तास तळ ठोकला. रात्री उशिरापर्यंत 179 कोटींहून अधिक रोकड मोजण्यात आली . नोटांच्या मोजणीत 30 हून अधिक कर्मचारी, 13 मशिन लागल्या.  आतापर्यंत मोजलेली रक्कम 80 बॉक्स भरून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत पाठवण्यात आली आहे. पियुषच्या कन्नौज येथील घरातून एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने सापडले आहेत.



    कन्नौजमधील परफ्यूम आणि कंपाउंड व्यापारी पीयूष जैन यांच्या घरावर शुक्रवारी रात्री उशिरा DGGI छापे टाकण्यात आले.  चाव्या न मिळाल्याने कपाट हातोड्याने तोडण्यात आले. येथून चार कोटी रुपये आणि एक कोटीचे दागिनेही टीमला मिळाले आहेत.

    रानू मिश्राचा लेखापाल असलेला विनीत गुप्ता देखील परफ्यूम आणि कंपाऊंडचा व्यापारी निघाला. पथकाने त्याला कचरी टोला येथील त्याच्या घरी नेले. रात्री उशिरापर्यंत ती त्याची चौकशी करत होती. येथून कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. आनंदपुरी येथील पियुष जैन यांच्या घराच्या भिंतीच्या आतही नोटांचे बंडले सापडले आहेत. बुधवारी कारवाई सुरू केली असता अधिकाऱ्यांना अनेक कपाटे बंद अवस्थेत आढळून आली.

    27 सदस्यांच्या पथकाची कारवाई

    अत्तर आणि कंपाऊंडच्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी छापा टाकणाऱ्या 27 सदस्यीय पथकाने अत्यंत गुप्तपणे कारवाई केली. टीम मेंबर्सकडे नंबर नसलेल्या बाइक्सही आहेत.
    या दोन्ही कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कारखाने, आस्थापनांमध्ये सुमारे 10 दिवसांपासून पथकातील काही सदस्य चकरा मारून महत्त्वाची माहिती गोळा करत असल्याची चर्चा आहे.

    IT RAID UTTAR PRADESH

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!