वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या सुमारे 62 हजार कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांचा एक ऑडिओ लीक झाला आहे, ज्यामध्ये ते कर्मचाऱ्यांना सांगत आहेत की, तुम्हाला काम करायचे असेल तर करा नाहीतर घरी बसा. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पुढील दोन वर्षे कठोर परिश्रम घेण्यास सांगण्यात आले आहे.IT Minister Vaishnav’s warning to BSNL employees Either work or quit, warns of forced retirement like Railways
अश्विनी वैष्णव यांनी कर्मचाऱ्यांना एकतर काम करण्यास किंवा व्हीआरएस घेण्यास सांगितले. अन्यथा, जे काम करत नाहीत त्यांना जबरदस्तीने व्हीआरएस दिले जाईल, जसे रेल्वेमध्ये होते.
BSNL साठी 1.64 हजार कोटींचे पॅकेज दिले
बीएसएनएलला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने अलीकडेच 1 लाख 64 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. या पॅकेजचे तीन भाग आहेत, त्यात सेवा सुधारणे, ताळेबंद मजबूत करणे आणि फायबर नेटवर्कचा विस्तार करणे समाविष्ट आहे. बीएसएनएलसाठी हे पॅकेज मंजूर केल्याने सरकारवरही जोरदार टीका होत आहे.
आम्ही बीएसएनएलला मदत करण्यास वचनबद्ध
सरकारच्या या निर्णयानंतर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, सरकार 4G सेवा देण्यासाठी BSNL ला स्पेक्ट्रम वाटप करेल. ते म्हणाले की बीएसएनएल मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दूरसंचार हे एक धोरणात्मक क्षेत्र आहे जिथे सरकार BSNL ला मदत करण्यास वचनबद्ध आहे.
सरकारी मदतीशिवाय कंपनी अडचणीत
केंद्रीय मंत्री म्हणतात की, 2019 मध्ये BSNL ला देण्यात आलेल्या पहिल्या पुनरुज्जीवन पॅकेजने कंपनीमध्ये बरीच स्थिरता आणली आहे. आता कंपनीला 1,64,156 कोटी रुपयांची नवी दिशा मिळेल. दूरसंचार बाजारात खासगी कंपन्या आघाडीवर आहेत. तंत्रज्ञान आणि सेवांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारी मदत मिळाली नाही तर कंपनी गंभीर संकटात सापडेल.
IT Minister Vaishnav’s warning to BSNL employees Either work or quit, warns of forced retirement like Railways
महत्वाच्या बातम्या
- पत्राचाळ घोटाळा : वर्षा राऊत यांची ९ तास चौकशी, खात्यावरील व्यवहारांचा तपास सुरू
- Azadi Ka Amrit Mahotsav : राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारके, पुरातत्व स्थळे, संग्रहालये यामध्ये 15 ऑगस्टपर्यंत फ्री एन्ट्री!!
- LIC मध्ये नोकरीची संधी : सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी करा अर्ज!!
- उपराष्ट्रपती निवडणूक : 450 ते 528 चा प्रवास; “लवचिक” मोदींच्या नेतृत्वात एनडीए आणखी मजबूत; विरोधी ऐक्य धुळीस!!