Wednesday, 7 May 2025
  • Download App
    इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी|It is wrong to call a company like Infosys a traitor, says Finance Minister Nirmala Sitharaman

    इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र मानल्या जात असलेल्या पांचजन्य या मासिकात इन्फोसिस कंपनीला राष्ट्रद्रोही असे म्हटले होते. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इन्फोसिससारख्या मोठ्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे.It is wrong to call a company like Infosys a traitor, says Finance Minister Nirmala Sitharaman

    वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर (आयटी) पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने टीका करताना पांचजन्यमध्ये इन्फोसिसला राष्ट्रद्रोही असे म्हटले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सीतारामन म्हणाल्या, ते वक्तव्य योग्य नव्हते. अशाप्रकारचं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. हे चांगलंच झालं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वक्तव्याशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. ते वक्तव्य फारच चुकीचे होते.



    सीतारामन म्हणाल्या त्या स्वत: इन्फोसिसबरोबर नवीन पोर्टलसंदर्भात काम करत होत्या. सरकार आणि इन्फोसिस एकत्र काम करत आहे. मी स्वत: नंदन निलकेणी यांना दोन वेळा त्यांना फोन केला आणि त्यांना ही समस्या सांगितली होती. मला विश्वास आहे की इन्फोसिस त्यांनी दिलेल्या शब्दानुसार प्रोडक्ट तयार करेल. यामध्ये थोडा विलंब नक्की झाला आहे. ज्यामुळे आम्हाला फटका बसलाय.

    आम्ही हे नवीन पोर्टल फार अपेक्षेने आणले आहे. यामध्ये थोडा गोंधळ आहे आणि आम्ही एकत्र काम करुन हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे इन्फोसिस हा गोंधळ लवकरच सोडवेल.

    पांचजन्यच्या लेखात म्हटले होते की, इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका वाटते. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. ही दोन्ही पोर्टल इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने तयार केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो

    उँची उडान, फिका पकवान अशी टीका करत या लेखासोबत मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, इन्फोसिसने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होत. अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो.

    सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत. करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे.

    भारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना्य इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, तुकडे-तुकडे टोळी यांना मदत केली आहे. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा सवालही लेखात करण्यात आला होता..

    It is wrong to call a company like Infosys a traitor, says Finance Minister Nirmala Sitharaman

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pakistan Prime Minister : हवाई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे पहिले विधान, म्हणाले- भारतीय लष्कर…

    Manoj Naravanes : ‘पिक्चर अभी बाकी है’, ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचं मोठं विधान

    Amit Shah : ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

    Icon News Hub