विशेष प्रतिनिधी
तेल अबीब : इस्त्राईलने ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवल्यानंतर आता १२ ते १६ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी अमेरिकी लस फायजरला आपत्कालिन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. Isryal,China begins vaccination for children
या ठिकाणी एकूण लोकसंख्येच्या ५५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पूवीप्रमाणे व्यवहार सुरू झाले असले तरी बंदिस्त हॉलमध्ये एकत्र येणाऱ्या नागरिकांना मास्कची अनिवार्यता ठेवली आहे.
दरम्यान चीनमध्ये ३ ते १७ वयोगटातील मुलांसाठी सिनोव्हॅक बायाटेक लसच्या आपत्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. तीन वर्षांपर्यतच्या मुलांना लस देणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत चीनमध्ये १८ पेक्षा अधिक वयोगटातील मुलांना लस दिली जात होती. अमेरिका, ब्रिटन, इस्त्राईल, युरोप आणि अन्य देशांत १२ ते १६ वयोटातील मुलांना लस दिली जात आहे. अर्थात चीनमध्ये कोणत्या वयाच्या मुलाला कधी लस दिली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Isryal,China begins vaccination for children
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांत कोरोना संसर्ग घटला, संचारबंदी शिथील
- निवडणुकीतील पराभवामुळे केरळच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना डच्चू
- विज्ञानाची गुपिते : जगात चित्ताच का सर्वांधिक वेगाने धावतो
- कोरोनावर ‘डीएनए’ आधारित लस प्रभावी, तैवानच्या शास्त्रज्ञांचा दावा
- केरळच्या मुख्यमंत्र्यांचा एक महाल बने न्यारा, शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी करणार एक कोटी रुपये खर्च