• Download App
    इस्रोकडून नव्या तंत्रज्ञानावर काम सुरू, जगात प्रथमच तयार होणार सेल्फ-डिस्ट्रक्ट सॅटेलाइट । ISRO Working On new technology worlds first self district satellite

    इस्रोकडून नव्या तंत्रज्ञानावर काम सुरू, जगात प्रथमच तयार होणार सेल्फ-डिस्ट्रक्ट सॅटेलाइट

    इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) इंटरस्टेलर ओव्हरड्राइव्हवर काम सुरू आहे. हॉलीवूडच्या साय-फाय चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणारे हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे. सेल्फ-डिस्ट्रक्ट रॉकेट्स हे त्यापैकी एक आहे, ज्याच्या तयारीत इस्रो आहे. ISRO आपल्या इनोव्हेशन हबमध्ये अशा 46 गोष्टी तयार करत आहे. ISRO Working On new technology worlds first self district satellite


    वृत्तसंस्था

    बंगळुरू : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) इंटरस्टेलर ओव्हरड्राइव्हवर काम सुरू आहे. हॉलीवूडच्या साय-फाय चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणारे हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे. सेल्फ-डिस्ट्रक्ट रॉकेट्स हे त्यापैकी एक आहे, ज्याच्या तयारीत इस्रो आहे. ISRO आपल्या इनोव्हेशन हबमध्ये अशा 46 गोष्टी तयार करत आहे.

    ISRO अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे जे हॉलीवूडपटांनाही मागे टाकू शकते. भारतीय अंतराळ संस्थेचे अध्यक्ष के सिवन यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, सध्या आमच्याकडे असलेली सर्व रॉकेट धातूचे आहेत. प्रक्षेपित झाल्यावर ते समुद्रात टाकले जातात. याशिवाय ते अंतराळात पोहोचले तर ते अवकाशातील कचरा बनतात. ते म्हणाले, आम्ही अशा तंत्रज्ञानावर काम करत आहोत, ज्यामध्ये रॉकेट स्वतःचा नाश करतील. त्यांचा अवकाशातील कचरा कमी असेल आणि रॉकेट समुद्रात पडण्यापासून टाळता येईल.



    के सिवन म्हणाले, आम्ही अशा धातूवर काम करत आहोत, ज्याचा वापर रॉकेटमध्ये करता येईल. या धातूपासून बनवलेले रॉकेट मोटारीसह प्रक्षेपणानंतर जळून राख होते. त्याचवेळी या मार्गावर पुढे जाताना, इस्रोचे डोळे एक विशेष तंत्रज्ञान तयार करण्यावर आहेत. हे तंत्रज्ञान स्वतःला नष्ट करणाऱ्या उपग्रहांचे तंत्रज्ञान आहे. उपग्रह किंवा अंतराळयान नष्ट केल्याने मोठा फायदा होईल. एखाद्या उपग्रहाची वेळ संपली की ‘किल बटण’द्वारे स्वतःला नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

    ISRO Working On new technology worlds first self district satellite

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती