ISRO Recruitment 2021: रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ विज्ञान संस्था (Indian Space Research Organization, ISRO) ने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अकाउंट्स ऑफिसरसहित इतर पदांसाठी भरती काढली आहे. याअंतर्गत एकूण 24 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. इच्छुक उमेदवार 21 एप्रिल 2021 किंवा त्याआधीच ऑनलाइन माध्यमातून या पदांवर अर्ज करू शकतात. ISRO Recruitment 2021 Golden Opportunity to Get a Job, Application Deadline till April 21
विशेष प्रतिनिधी
ISRO Recruitment 2021: रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ विज्ञान संस्था (Indian Space Research Organization, ISRO) ने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अकाउंट्स ऑफिसरसहित इतर पदांसाठी भरती काढली आहे. याअंतर्गत एकूण 24 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. इच्छुक उमेदवार 21 एप्रिल 2021 किंवा त्याआधीच ऑनलाइन माध्यमातून या पदांवर अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जांना सुरुवात : 1 एप्रिल 2021
ऑनलाइन अर्जांची अंतिम तिथी : 21 एप्रिल 2021
फीस भरण्याची अंतिम तारीख : 23 एप्रिल 2021
पदांचे विवरण
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर – 6 पदे
अकाउंट्स ऑफिसर – 6 पदे
पर्चेज अँड स्टोअर्स ऑफिसर – 12 पदे
शैक्षणिक पात्रता
अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीएसोबतच सुपरवायजर पदाचा 1 वर्षांचा अनुभव, वा पोस्ट ग्रॅजुएशनसह 3 वर्षांचा अनुभव (पर्यवेक्षी क्षमतेत 1 वर्ष) किंवा 5 वर्षांच्या अनुभवासोबत पदवीधारक (पर्यवेक्षक क्षमतेत 2 वर्षे) असणे गरजेचे आहे.
अकाउंट्स ऑफिसरच्या पदावर ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून एसीए / एफसीए किंवा एआयसीडब्ल्यूए / एफआईसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा मग एमकॉममध्ये 1 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. याशिवाय B.Com/BBA/BBM (पर्यवेक्षी क्षमतेत 2 वर्षे) असले पाहिजे.
पर्चेस अँड स्टोअर्स ऑफिसर पदावर ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून मटेरियल मॅनेजमेंटमध्ये एमबीएची पदवी आणि सुपरवायजर म्हणून एक वर्षाचा अनुभव असावा. किंवा मग मटेरियल मॅनेजमेंटमध्ये पदवी आणि पदव्युत्तर असले पाहिजे.
असा करा अर्ज
इस्रोच्या विविध पदांवर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.isro.gov.in/ वर जावे लागेल. यानंतर ठरवलेल्या प्रारूपात अर्ज करावा लागेल. असे न झाल्यास अर्ज बादही केला जाऊ शकतो.
ISRO Recruitment 2021 Golden Opportunity to Get a Job, Application Deadline till April 21
महत्त्वाच्या बातम्या
- नंदिग्रामच्या महासंग्रामात ‘ड्रामा-अॅक्शन-इमोशन’ ; दिवसभर वार-पलटवार ; ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी ‘आमने – सामने’
- हरिद्वारच्या कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवात, यंदाच्या सोहळ्यावर कोरोनाची गडद छाया
- ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल
- म्यानमारमधील स्थलांतराची आत्ता कुठे सुरुवात, भारतापुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची भिती
- चोरीला गेलेल्या सुवर्णगणेशाची पुनर्स्थापना करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी, दिवेआगर पुन्हा भाविकांनी गजबजणार