वृत्तसंस्था
जेरुसलेम : इस्राईलचे ११ वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते आयझॅक हेरझॉग यांची निवड झाली आहे. त्यांना संसदेतील १२० पैकी ८७ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. Israel get new president
रझॉग हे लेबर पक्षाचे नेते असून त्यांचे वडिल काइम हेरझॉग यांनीही १९८३ ते १९९३ दरम्यान अध्यक्षपद भूषविले होते. माजी अध्यक्षांच्या मुलाची त्याच पदावर निवड होण्याची इस्राईलमधील ही पहिलीच घटना आहे.
सध्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात विखारी संघर्ष सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवडीला महत्व आले आहे. पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या मताशी सहमत दर्शविणारे नेते म्हणून हेरझॉग यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे अध्यक्ष व पंतप्रधानाची जोडी आखातातील संघर्ष काबूत राखण्यासाठी कितपत उपयुक्त ठरते याकडे जगाचे लक्ष असेल.
पुढील महिन्यात विद्यमान अध्यक्ष रोवेन रिव्हलीन निवृत्त यांचा कार्यकाळ संपत असून त्यानंतर ९ जुलैपासून हेरझॉग यांची सात वर्षांची कारकिर्द सुरु होईल. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हेरझॉग यांचे अभिनंदन केले आहे.
Israel get new president
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजा’च्या विरोधात बोलणे म्हणजे तुम्हाला हमखास शिक्षा, राकेश टिकैत यांची मोदींवर टीका
- ब्रिटनमध्ये दहा महिन्यात प्रथमच कोरोनाचा एकही बळी नाही
- पोस्ट ऑफिसमध्ये कोरोनाविरोधी लसीकरण नोंदणी; तेलंगणाच्या ग्रामीण भागात सुविधा
- जागतिक बँकेच्या शैक्षणिक सल्लागारपदी रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती
- जम्मू-कश्मीर! पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते त्रालचे नगराध्यक्ष राकेश पंडिता सोमनाथ यांचा मृत्यू
- श्रीनगरच्या ‘बडा घर’ गावाची अनुकरणीय प्रथा, हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही; नियम तोडणाऱ्याला टाकतात वाळीत
- सुनील गावस्कर म्हणतात…मी आणि सचिनपेक्षाही हा मोठा भारतीय आयकॉन
- फरार चोक्सी लवकरच गजाआड, चोक्सीच्या लंडनच्या वकिलांचे दावे डॉमिनिक कोर्टाने फेटाळले