विशेष प्रतिनिधी
तेहरान : इराणच्या नौदलाच्या सर्वांत मोठ्या युद्धजहाजाला आग लागून या जहाजाला जलसमाधी मिळाली. ओमानच्या आखातात ही घटना घडली. या दुर्घटनेमागे घातपात असल्याचा आखातात पुन्हा संघर्षांचा भडका उडू शकतो अशी तज्ञांना भीती आहे. Irans warship sinked
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणी नौदलाच्या खर्ग या युद्धजहाजावर पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. ही आग विझविण्याचे मोठे प्रयत्न होऊनही त्यात अपयश आले.
या आगीत जहाजाची प्रचंड हानी होऊन ते बुडाले. या जहाजावरील अनेक जणांना बाहेर काढतानाची छायाचित्रे इराणमधील समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. ‘खर्ग’ हे प्रशिक्षण जहाज असल्याचे इराण सरकारचे म्हणणे आहे. इतर जहाजांना मदत पुरविण्याची क्षमता असलेली फार कमी जहाजे इराणकडे असून ‘खर्ग’ हे त्यापैकीच एक आहे. एखाद्या मोहिमेत हेलिकॉप्टरचे उड्डाणही या जहाजावरून करता येते.
इराणच्या जहाजांवर गेल्या दोन वर्षांपासून संशयास्पद हल्ले होत असल्याने आज लागलेल्या आगीमागेही घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. इराणने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
Irans warship sinked
महत्त्वाच्या बातम्या