वृत्तसंस्था
तेहरान : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर उफाळलेल्या निदर्शनांवर इस्लामिक रिपब्लिक पोलिस (नैतिकता पोलिस) कारवाईत किमान 31 नागरिक ठार झाले आहेत. ओस्लोस्थित एका स्वयंसेवी संस्थेने गुरुवारी हा दावा केला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर आंदोलक संतप्त झाले असून गुरुवारी शहरातील अनेक भागात पोलिस ठाणे आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.Iran Hijab Controversy: Protests Turn Violent After Death of Mahsa Amini in Custody, 31 Killed
इराण मानवाधिकार (IHR) चे संचालक महमूद अमीरी-मोगद्दम यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “इराणचे लोक त्यांचे मूलभूत हक्क आणि मानवी प्रतिष्ठेचे समर्थन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि सरकार त्यांच्या शांततापूर्ण निषेधाला गोळ्यांनी प्रत्युत्तर देत आहे. इराण मानवाधिकारने 30 हून अधिक शहरे आणि गावांमध्ये होत असलेल्या आंदोलनांची पुष्टी केली आहे.
अमिनीच्या मृत्यूनंतर उसळला हिंसाचार
अमिनीच्या मृत्यूच्या विरोधात प्रथम कुर्दिस्तानच्या उत्तरेकडील प्रांतात सुरुवात झाली, जिथे अमिनीचा जन्म झाला, परंतु आता हे लोण देशभर पसरले आहे. IHR ने सांगितले की, बुधवारी रात्री उत्तर माझांदरन प्रांतातील अमोल शहरात 11 लोक आणि त्याच प्रांतातील बाबोल येथे सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय तबरीझमधील निदर्शनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
हिंसक निषेध
दुसरीकडे मेहसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. महसाच्या मृत्यूच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. हळूहळू हे आंदोलन इराणमधील ५० हून अधिक शहरे आणि गावांमध्ये पसरले आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अनेक ठिकाणांहून निदर्शने सुरू असल्याच्या बातम्याही आल्या आहेत, जिथे आंदोलकांनी पोलिस स्टेशन आणि त्यांची वाहने जाळली आहेत.
महसा अमिनीवर कोठडीत प्राणघातक हल्ला
इराणमध्ये 22 वर्षीय मेहसा अमिनी हिला हिजाब न घातल्यामुळे पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कोठडीत मारहाण केल्याचा आरोप आहे, त्यामुळे ती कोमात गेली. या घटनेनंतर तीन दिवसांनी महसाचा मृत्यू झाला. मात्र, अधिकाऱ्यांनी महसाच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले.
Iran Hijab Controversy: Protests Turn Violent After Death of Mahsa Amini in Custody, 31 Killed
महत्वाच्या बातम्या
- पीएफआयवरील एनआयएच्या कारवाईवर प्रकाश आंबेडकर म्हणाले: टेरर फंडिंगचे पुरावे दाखवा, नाहीतर लोक मुस्लिमविरोधी अजेंडा मानतील
- ‘दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर राजकारण करू नका’, संयुक्त राष्ट्रात भारताने दहशतवाद्यांवर ठणकावले
- NIA छापे : कट्टरतावादी संघटना “ऑपरेशन PFI” यशस्वी झाले कसे??; रहस्य काय??, पुढे होणार काय??
- दलाई लामा : चीनमध्ये नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मोकळ्या मरण पत्करायला आवडेल