IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनला आजपासून सुरुवात होत आहे. IPL मध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI)आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) दरम्यान चेन्नईत होणार आहे. कोरोना महामारीच्या संकटादरम्यान या स्पर्धेतील सामना प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. 30 मेपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार असून देशभरातील 6 शहरांमध्ये सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. IPL 2021: The first match of the IPL will be between Kohli and Rohit starting today
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनला आजपासून सुरुवात होत आहे. IPL मध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI)आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) दरम्यान चेन्नईत होणार आहे. कोरोना महामारीच्या संकटादरम्यान या स्पर्धेतील सामना प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. 30 मेपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार असून देशभरातील 6 शहरांमध्ये सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ने पाच वेळा विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे, विराट कोहलीच्या टीमला एकही आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे करता आलेली नाही. तरीही दोन्ही संघांमधील संघर्ष पाहण्यासारखा असेल.
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदरम्यान आतापर्यंत 29 सामने झालेले आहेत. यापैकी पाच वेळा आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सने 19 सामने आपल्या जिंकलेले आहेत. तर 10 सामन्यांत आरसीबीने विजय मिळवलेला आहे. या 29 सामन्यांमध्ये 27 वेळा तर आयपीएलमध्येच या दोघांमध्ये मुकाबला झालाय, तर दोन सामने चॅम्पियन्स लीगमध्ये खेळवण्यात होते.
आयपीएलचा पहिला सामना चेन्नईत होईल, येथील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा खेळवला जाणार आहे. यावेळी आयपीएलसाठी बीसीसीआयने केवळ सहा मैदानांची निवड केली आहे. यामुळे कोणत्याही संघाला आपल्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही. आतापर्यंत दोन्ही संघांदरम्यान बहुतांश सामने हे एकतर मुंबई झालेले आहेत किंवा बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेले आहेत. एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आतापर्यंत दोन सामने झालेले आहेत. येथे दोन्ही संघ एक-एक वेळा जिंकलेले आहेत. यामुळे आजचा सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
IPL 2021: The first match of the IPL will be between Kohli and Rohit starting today
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-चीनदरम्यान आज चुशुलमध्ये चर्चेची 11वी फेरी, तणाव निवळण्यासाठी आणखी प्रयत्नांवर देणार भर
- उन्नाव बलात्कारातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला भाजपचे पंचायत निवडणूकीत तिकीट
- ममता बॅनर्जींना निवडणूक आयोगाची आणखी एक नोटीस, केंद्रीय दलांवर शंका घेणे दुर्दैवी
- Jammu-Kashmir Encounter : त्रालमध्ये चकमक, सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा
- नियमावलीची ऐशीतैशी : दादरच्या भाजीमंडईत उसळली अलोट गर्दी, कोरोनाची भीतीच उरली नाही