• Download App
    जगभरात इंटरनेट सेवा अचानक झाली ठप्प, खासगी कंपनीमुळे फटका बसल्याचा दावा। Internet services across the globe have been hit hard, with a private company claiming to have been hit

    जगभरात इंटरनेट सेवा अचानक झाली ठप्प, खासगी कंपनीमुळे फटका बसल्याचा दावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांत मंगळवारी इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने खळबळ उडाली. अनेक मोठमोठ्या वेबसाईट ओपन झाल्या नाहीत. त्यावर ‘एरर-503 सर्व्हीस अनअव्हेलेबल’ असा संदेश दिसत होता. यात सोशल मीडिया, सरकारी आणि न्यूज वेबसाईट्सचा समावेश होता. युरोप-अमेरिकेतील वेब सेवांना याचा सर्वात मोठा फटका बसला. Internet services across the globe have been hit hard, with a private company claiming to have been hit

    एका सीडीएन ( पंटेंट डिलिव्हरी नेटवर्क) कंपनीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प झाली. असं मानलं जातंय की, अमेरिकेची क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा देणारी कंपनी ‘फास्टली’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. अधिक तपशील मिळवण्याचे काम सुरू आहे.



    कोणत्या साईटस्वर परिणाम

    न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन यांच्यासह मोठ्या आंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईट आणि पोर्टल डाऊन झाले. गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी आणि फायनान्शिअल टाइम्स यासारख्या साईट्स यांनाही अडचणींचा सामना करावा लागला.
    लोकप्रिय शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉन तसेच रेडीट, स्पॉटिफाय, पेपल, शॉपिफाय आदी साईट्स ठप्प झाल्या. ब्रिटिश सरकारची वेबसाईट gov.uk काम करत नव्हती.

    ‘फास्टली’चे म्हणणे काय…

    सीडीएन म्हणजेच कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स हा इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चरचा महत्त्वाचा भाग मानला जातो. ‘फास्टली’सारख्या कंपन्या ही सर्व्हीस पुरवतात. त्या आपल्या ग्लोबल नेटवर्कच्या माध्यमातून वेब सेवांना उत्तम बनवतात. तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे, असे अमेरिकेच्या फास्टली कंपनीने सांगितले. काही वेबसाईट हळूहळू सुरू होत असल्याचेही म्हटले आहे. ही समस्या का निर्माण झाली, याबाबत आता काही सांगणे कठीण आहे. सायबर हल्ला किंवा अन्य बाह्य हस्तक्षेप याबद्दल कंपनीने काहीच सांगितलेले नाही.

    Internet services across the globe have been hit hard, with a private company claiming to have been hit

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही

    Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय