terrorist organization SFJ : गुप्तचर संस्थेने अलीकडेच एक अलर्ट जारी केला आहे की, प्रतिबंधित दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिस (SFJ) संसद भवनाचा घेराव करून त्यावर खलिस्तानी ध्वज फडकावू शकते. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. यानुसार सीख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याने यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ जारी केला आहे. 29 नोव्हेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसदेला घेराव घालण्याचे आणि ध्वजारोहण करण्याचे आवाहन या व्हिडीओमध्ये बराच काळापासून कृषी कायद्यांच्या विरोधात बसलेल्या शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. Intelligence alert terrorist organization SFJ can hoist Khalistani flag on Parliament House
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गुप्तचर संस्थेने अलीकडेच एक अलर्ट जारी केला आहे की, प्रतिबंधित दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिस (SFJ) संसद भवनाचा घेराव करून त्यावर खलिस्तानी ध्वज फडकावू शकते. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. यानुसार सीख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याने यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ जारी केला आहे. 29 नोव्हेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसदेला घेराव घालण्याचे आणि ध्वजारोहण करण्याचे आवाहन या व्हिडीओमध्ये बराच काळापासून कृषी कायद्यांच्या विरोधात बसलेल्या शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
‘संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवणाऱ्याला बक्षीस’
संसद भवनावर खलिस्तानचा झेंडा फडकावणाऱ्याला दीड लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल, असेही पन्नूने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. गुप्तचर विभागाने दिल्ली पोलिसांसह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबतच संसद भवनाभोवती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
यापूर्वीही शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न
या बंदी घातलेल्या खलिस्तानी गटाने आंदोलक शेतकऱ्यांना भडकवण्याच्या उद्देशाने वर्षाच्या सुरुवातीला एक घोषणा केली होती. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो कोणी खलिस्तानी ध्वज फडकावेल त्याला अडीच लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. एसएफजेचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एका व्हिडिओमध्ये जारी करून हे बक्षीस जाहीर केले होते.
एसएफजे एनआयएच्या रडारवर
SFJसह इतर खलिस्तानी संघटना आणि त्यांच्याशी संबंधित एनजीओचा निधी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) रडारवर आहे. या संघटनांवर कारवाई करण्यासाठी एनआयएचे पथक नुकतेच कॅनडाला पोहोचले होते. आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कॅनडाला गेले होते.
Intelligence alert terrorist organization SFJ can hoist Khalistani flag on Parliament House
महत्त्वाच्या बातम्या
- Good News : आंतरजातीय लग्न केले तर 5 लाख मिळणार ! सामाजिक सलोख्याला चालना देण्यासाठी या राज्याचा मोठा निर्णय …
- पेट्रोल आणि डिझेलनंतर गॅस सिलिंडरवरही मोदी सरकार देणार मोठा दिलासा, डिसेंबरपासून दर कमी होण्याची शक्यता
- मोठी बातमी : केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले- आता पराली जाळणे गुन्हा नाही! शेतकऱ्यांनी परत जावे, केसेस मागे घेण्याची जबाबदारी राज्यांची!
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बैठक घेणार ; जागतिक स्तराच्या नव्या विषाणूवर चर्चा करणार
- कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन स्ट्रेनची दहशत : दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांचे मुंबई विमानतळावर क्वारंटाइन आणि जिनोम सिक्वेन्सिंग करणार